rahul gandhi | soniya gandhi
rahul gandhi | soniya gandhisarkarnama

Congress News : गांधी घराण्याशी निष्ठेचे फळ; महाराष्ट्रातील महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

Jammu and Kashmir Assembly elections : काँग्रेस पक्षाने जम्मू-काश्‍मीर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे.
Published on

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व संसदेचे विरोधी पक्षनेते, राहुल गांधी यांच्या विश्‍वासू आणि निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या रजनी पाटील यांना त्यांच्या कर्तृत्व आणि निष्ठेचे फळ मिळाले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी प्रभारीपद भूषविलेल्या रजनी पाटील आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारक असतील.

काँग्रेस ( Congress ) पक्षाने जम्मू-काश्‍मीर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. यात महाराष्ट्रातून एकमेव खासदार रजनी पाटील यांचा समावेश आहे. यापूर्वी रजनी पाटील यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्‍मीर राज्याचे काँग्रेसचे प्रभारीपद सांभाळले आहे. जम्मू-काश्‍मिरचा राहुल गांधींचा दौराही त्यांच्याच प्रभारीपदाच्या काळात झाला होता.

rahul gandhi | soniya gandhi
Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी राहुल गांधींच्या 'या' मुद्यावर सुरात सूर मिसळला

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ), जयराम रमेश, अंबिका सोनी, अजय माकन, सलमान खुर्शीद, कन्हैया कुमार आदींच्या यादीत आता रजनी पाटील असणार आहेत. यापूर्वी पाटील यांनी इतर राज्यांचे पक्षाचे प्रभारी म्हणूनही काम केलेले आहे. गांधी घराण्याच्या विश्‍वासू अशी त्यांची ओळख आहे.

rahul gandhi | soniya gandhi
Rahul Gandhi : काँग्रेसला विजयाचा कॉन्फिडन्स, हरियाणामध्ये राहुल गांधींना कसली भीती?

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात पक्षात सक्रिय झालेल्या रजनी पाटील या सोनिया गांधी यांनी राजकारणात पाय ठेवल्याच्या दिवशीपासून त्यांच्यासोबत आहेत. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या त्या विश्‍वासू आणि निकटवर्तीय मानल्या जातात. पक्षाने त्यांना राज्यसभेवर दुसऱ्यांदा संधी दिली आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय महिला विकास महामंडळाचे अध्यक्षपद, राज्याचे खादी ग्रामोद्योगचे अध्यक्षपदासह अनेक संघटनात्मक पदांवर काम केलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com