
Government Officer’s Assets Shock Authorities : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक धक्कादायक किस्से ऐकायला मिळतात. काहीजण तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकतात, तर काही जण तुरुंगातही जातात. पण त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुख्यात कहाण्या वर्षानुवर्षे यंत्रणांना सतावत असतात. अशाच एका भ्रष्टाचाराचा देशात पर्दाफाश झाला आहे. कधीकाळी ज्या महिला अधिकाऱ्याविषयी प्रशासन अभिमानाने बोलत होते, आता ती अधिकारी गजाआड आहे.
नूपुर बोरा असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. आसाम प्रशासकीय सेवेतील या युवा अधिकाऱ्याने प्रशासनाची झोप उडवली आहे. केवळ पाचच वर्षे सरकारी सेवेत घालविलेल्या नूपुर बोरा यांच्या घरात तपास यंत्रणांना सुमारे 1 कोटी रुपयांचे दागिने आणि एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राज्याचे मुख्यमंत्रीही चक्रावले आहेत.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विशेष सतर्कता शाखेने नूपुर बोरा यांच्या घरावर नुकतीच छापेमारी केल्यानंतर मोठ्या भ्रष्टाचाराचा उलगडा झाला आहे. गोलघाट जिल्ह्यातील नूपुर बोरा हिने 2019 मध्ये प्रशासनात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे एक उत्साही आणि मेहनती अधिकारी म्हणून पाहिले जात होते. कुटुंबासह समाजालाही त्यांच्याविषयी अभिमान होता.
नूपुर बोरा यांच्याविषयीच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. जमीन खरेदीविक्री प्रकरणांमध्ये हेराफेरी करत असल्याच्या संशय यंत्रणां होता. अखेर यंत्रणांनी त्याचा उलगडा केला आणि त्यांना अटक केली. त्यांच्यासोबत एका कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. दोघांनी मिळून जमिनींचे व्यवहार केले आहेत.
नेमके काय घडले?
बरपेटा येथे सर्कल अधिकारी असताना नूपुर बोरा यांनी हिंदूंच्या जमिनी काही संशयित व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. त्याबदल्यात मोठी रक्कम त्यांना मिळाली. त्यामुळे आसाममध्ये हे प्रकरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री सरमा यांनी या घटनेचा दाखला देत कडक संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले की, नूपुर बोराने बरपेटा येथे सर्कल अधिकारी असताना हिंदूंच्या जमिनी संशयित व्यक्तींना हस्तांतरिकत केल्या. हे खपवून घेणार नाही. महसूल विभागातील प्रामुख्याने अल्पसंख्यांकबहुल भागात वाढलेल्या भ्रष्टाचारावर कडक कारवाई सुरूच राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.