BJP-Congress Dispute News : हॉर्न वाजविण्यावरून काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले : तुफान दगडफेक, सहा जखमी, १२० जणांवर गुन्हे

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.
Car glass broken by stone pelting
Car glass broken by stone peltingSarkarnama

बंगळूर : काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना वाहनांचे हॉर्न वाजविण्यास भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यावरून सुरू झालेला वाद दगडफेकीपर्यंत गेला. यामध्ये १५ वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना कर्नाटकातील (Karnataka) यादगिरी जिल्ह्यातील कोडेकल येथे घडली. (Stone pelting between Congress-BJP workers over horn blowing)

या दगडफेक प्रकरणी कोडेकल पोलिसांनी १२० जणांविरुद्ध चार गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. यादगिरी जिल्ह्यातील कोडेकल येथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वादात दगडफेक झाली. यात जखमी झालेल्या सहा जणांना विजयपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Car glass broken by stone pelting
Former CM Car Accident : नशीब बलवत्तर....एअरबॅग उघडली अन्‌ माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. गावातील बसवण्णा देवरू यांच्या वार्षिक जत्रेजवळून काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या वाहनातून जात होते. जत्रेच्या मध्यभागी काँग्रेस कार्यकर्त्यांना वाहनांचे हॉर्न वाजविण्यास भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे वाद सुरू झाला व त्यानंतर दगडफेक झाली. यात १५ वाहनांच्या मागील खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि सहा जण जखमी झाले.

Car glass broken by stone pelting
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार; पण मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा

पोलिस अधीक्षक सी. बी. वेदमूर्ती यांनी शोरापूर विधानसभा मतदारसंघात ‘सीआरपीसी’च्या कलम १४४ अन्वये ६ एप्रिल रात्री आठ ते ८ एप्रिल रात्री आठपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. ज्यात कोडेकलचा (ता. हुनसागी, जि. यादगीर, कर्नाटक) समावेश आहे. कर्नाटक राज्य राखीव पोलिसच्या (केएसआरपी) तीन प्लाटून आणि निमलष्करी दलाच्या दोन तुकड्या, दोन पोलिस उपअधीक्षक, पाच मंडळ निरीक्षक, १० उपनिरीक्षक, १०० कॉन्स्टेबल गावात आणखी चकमक होऊ नये म्हणून तैनात करण्यात आले आहेत.

Car glass broken by stone pelting
Baramati Lok Sabha : बारामतीत शंभर टक्के कमळ फुलणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा भोरमध्ये दावा

दरम्यान, माजी आमदार व्यंकटप्पा नाईक यांनी मतदारसंघात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आमदार नरसिंह नायक (राजू गौडा) यांनी केला. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला मतदारसंघात सशस्त्र दल तैनात करण्याची विनंती केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com