Odisha Chief Minister : ओडिशातही मोदी-शाहांचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू

Odisha Assembly Election 2024 BJP in Power Odisha Chief Minister : ओडिशामध्ये भाजपने नवीन पटनायक यांची सत्ता उलथून टाकली आहे. आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याची चर्चा सुरू आहे.
Manmohan Samal, Dharmendra Pradhan, Laxman Bag
Manmohan Samal, Dharmendra Pradhan, Laxman BagSarkarnama

Odisha : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी कधी होणार, याची चर्चा सुरू असताना ओडिशामध्ये मात्र राज्याचा गाडा कोण हाकणार, यावर मंथन सुरू आहे. मावळते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर भाजपने या राज्यातही सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ओडिशात 147 जागांपैकी भाजपला 78 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नवीन पटनायक यांचे 24 वर्षांची सत्ता एका झटक्यात गेली. त्यांच्या बिजू जनता दलाला केवळ 51 जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने आमदारांची जुळवाजुळव करण्याची चिंता नाही. पण धडपड सुरू झाली आहे ती मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची.

चर्चेमध्ये सर्वात पहिले नाव आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचे. ते ओडिशातील संबलपूरचे खासदार आहेत. ओडिशा अस्मिता अभियानाची सुरूवात त्यांनीच केली होती. मागील दहा वर्षे ते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

दुसरे नाव म्हणजे लक्ष्मण बाग. त्यांनीच पटनायक यांना पराभूत केले आहे. बोलांगीर जिल्ह्यातील कांटाबांजी विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. पटनायक यांना पराभूत केल्याने एका रात्रीत त्यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे.

Manmohan Samal, Dharmendra Pradhan, Laxman Bag
Bihar CM Nitish Kumar : नितीशबाबूंचे मोदी-शाहांवर प्रेशर; दिल्लीत ‘अग्नी’ भडकणार

बाग हे एका गरीब शेतकरी कुटुंबातील नेते म्हणून पुढे आले आहेत. सुरूवातीला मजूरी आणि नंतर त्यांनी स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. मागील दोन विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पण यावेळी त्यांनी विजय मिळवत इतिहास घडवला आहे. त्यामुळे त्यांनाही भाजपकडून पसंती दिली जाऊ शकते.

CM च्या रेसमध्ये तिसरे नाव आहे ते मनमोहन सामल यांचे. विद्यार्थीदशेपासून भाजपशी जोडलेले गेलेले सामल ओडिशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजप आणि बीजेडीच्या आघाडी सरकारमध्ये २००४ मध्ये ते मंत्री होते. राज्यसभेतही त्यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या नावावरही विचार सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, मागील काही घटनांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचे नाव फायनल करताना धक्का दिला आहे. चर्चेतील नावावर फुली मारत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे ओडिशातही असा धक्का बसणार का, याची उत्सुकता वाढली आहे. मोदींचा शपथविधी झाल्यानंतरही ओडिशातील सरकारचा शपथविधी होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com