IT Survey on BBC: बीबीसीचे महत्वाचे दस्ताऐवज IT च्या ताब्यात ; ६० तास चौकशी..

Income Tax Department Survey on BBC : चौकशी संपली. अनेक कागदपत्रे, दस्ताऐवज अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
IT Survey on BBC
IT Survey on BBCSarkarnama
Published on
Updated on

Income Tax Department Survey on BBC Latest Updates: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC)च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर देशात खळबळ माजली होती. सुमारे ६० तास ही चौकशी सुरु होती, त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी बीबीसी कार्यालयातून बाहेर पडले.

बीबीसी म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या कार्यालयात आयकर विभागाचे सर्वेक्षण काल (गुरुवारी) म्हणजेच सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. काल रात्री उशीरा ही चौकशी संपली. बीबीसीकडून अनेक कागदपत्रे, दस्ताऐवज अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

IT Survey on BBC
BJP :'मुस्लिम वोट बँक' साठी भाजप सूफी-संतांच्या चरणी..; लोकसभेसाठी असा आहे मास्टर प्लॅन

बीबीसीचे अनेक कर्मचारी हे कार्यालयातून बाहेर पडले आहेत. काही कर्मचाऱ्यांना येथे राहण्यास सांगितले आहे. मंगळवार सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करीत आहेत.त्याला बीबीसीचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत. "आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना मदत करीत आहोत, लवकर परिस्थिती सामान्य होईल," असे बीबीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयकर विभागाचे सर्वेक्षण पथक, आर्थिक व्यवहार, कंपनीची रचना आणि न्यूज कंपनीच्या इतर तपशीलांची माहिती घेण्यात येत आहे. बीबीसीच्या उपकंपन्यांचे आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमतीशी संबंधित समस्यांचे परीक्षण करण्यासाठी सर्वेक्षण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीबीसीच्या कथित वादग्रस्त माहितीपटावरील बंदी हटवा..

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.समाजसेवक मुकेश कुमार यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.माध्यमांच्या स्वातंत्र्याचा हवाला देत सुप्रीम कोर्टाला योग्य आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या याचिकेत बीबीसीच्या कथित वादग्रस्त माहितीपटावरील बंदी हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com