Old Parliament Name Change : जुन्या संसदेला 'संविधान भवन' म्हणून ओळख मिळावी; नरेंद्र मोदींची सूचना

Sanvidhan Bhavan And Narendra Modi : सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदींचे शेवटचे भावनिक भाषण
Parliament, Narendra Modi
Parliament, Narendra ModiSarkarnama

Delhi News : "जुन्या संसदेतून निरोप घेऊन आपण नवीन संसदेत जात आहोत. या संसदेतून जाताना दोन्ही सभागृहांतील सदस्यांना आवाहन करत आहे. नव्या संसदेत जाताना जुन्या संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. हे भवनाची जुनी संसद म्हणून ओळख राहायला नको. त्यामुळे माझी विनंती आहे, की या संसदेला 'संविधान भवन' म्हणून ओळख मिळावी. ही संसद आपल्याला प्रेरणा देत राहील. आजपर्यंत येथे बसलेल्या सर्व महापुरुषांची आठवण करून देईल. तसेच भावी पिढीला एक भेट देण्याची संधी दवडू देऊ नये," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद सदस्यांना केले. यानंतर त्यांनी सर्वांना नव्या संसदेसाठी सर्वांना शुभेच्छाही दिल्या. (Latest Political News)

Parliament, Narendra Modi
New Parliament Building : आजपासून नव्या इमारतीत संसदेचे कामकाज; पहिल्या दिवशी खासदारांना मिळणार खास गिफ्ट

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये २०४७ पर्यंत भारताच्या विकासाचा संकल्प यावर कार्यक्रम पार पडला. सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड, पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शन केले. यावेळी पंतप्रधान मोदी संसदेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यातील भारताचे चित्र कसे असेल, याचीही झलक खासदारांना दाखवली.

सध्याची संसद भविष्यात जुनी म्हणून ओळखली जाऊ नये. या संसद भवनची प्रतिष्ठा कायम ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याची जाणीवही मोदींनी करून दिली. यासाठी ही संसद भविष्यात संविधान भवन म्हणून ओळखली जावी, अशी सूचना करत, यावर विचार करण्याचेही आवाहन मोदींनी खासदारांना केली. ही भवी पिढीसाठी आपल्याला भेट देण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, जुन्या संसदेत होणारे कामकाज आजपासून नव्या संसदेत होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Parliament, Narendra Modi
Parliament Special Session Schedule: आज ऐतिहासिक दिवस! संसदेचे कामकाज नव्या इमारतीत स्थलांतर; 'असे' असणार दिवसाचे कामकाज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com