Parliament Special Session : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारपासून विशेष अधिवेशनाचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज संसदेच्या नव्या इमारतीत सुरू होणार आहे. नवीन इमारतीतील कामकाजाच्या या पहिल्या दिवशी सदस्यांना विशेष गिफ्ट देण्यात येणार आहे. या गिफ्टचे किट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभा सदस्य मनमोहनसिंग आणि इतर प्रमुख नेत्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. (Latest Political News)
जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये भारताला २०४७ पर्यंत विकास राष्ट्र बनवण्याचा संकल्पावर कार्यक्रम होणार आहे. या वेळी पंतप्रधान मोदी (Narendra Modi), उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर संसदेच्या सदस्यांना एक किट भेट म्हणून देण्यात येणार आहे. या किटमध्ये भारतीय संविधानाची प्रत, 75 रुपयांचे चांदीचे नाणे, नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका आणि टपाल तिकीट यांचा समावेश असणार आहे.
सकाळच्या कार्यक्रमानंतर दुपारी सव्वाएक वाजता लोकसभेचे, तर राज्यसभेचे कामकाज सव्वादोन वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष कामकाजाचे पहिले अधिवेशन सोमवारी जुन्या संसद भवनात पार पडले. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये संसदीय ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासाविषयी चर्चा झाली. (New Parliament)
जुन्या संसद भवनात पंतप्रधान मोदींनी शेवटचे भावनिक भाषण केले. त्यांनी जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्यासह माजी पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण केले. देशाच्या लोकशाही परंपरांना भरभरून श्रद्धांजली वाहिली आणि संसद भवनाचा इतिहास आणि वारसा याबद्दल माहिती दिली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.