Mamata Banerjee : …तर ‘ती’ केस CBI कडे देणार! ममतांनी आपल्याच पोलिसांना दिला अल्टिमेटम

Kolkata Doctor Rape-Murder Case West Bengal Police : पश्चिम बंगालमधील शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याचे घटनेने वादळ उठले आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Kolkata : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यावर पश्चिम बंगालमधील राजकारणा चांगलंचं तापलं आहे. देशभरात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे.

कोलकाता पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून एकाला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा रविवारीपर्यंत लावण्याची मुदत ममतांनी पोलिसांनी दिली आहे. अन्यथा ही केस सीबीआयकडे सोपवली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. बहुतेकवेळा सीबीआयकडे तपास देण्यास विरोध करणाऱ्या ममतांनी स्वत:हून ही केस सीबीआयकडे देण्याची तयारी दर्शवल्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Mamata Banerjee
Rahul Gandhi Vs Kangana Ranaut : राहुल गांधी खतरनाक, विध्वंसक, कलंक..! खासदार कंगना एवढ्या का भडकल्या?

ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत ममता बॅनर्जी म्हणाल्या, यामध्ये दोषी असलेल्या प्रत्येकाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. तपास फास्टट्रॅकवर व्हायला हवा. म्हणजे त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियाही वेगाने पुढे जाईल. रुग्णालयात नर्स आणि सुरक्षारक्षक असूनही ही घटना घडल्याने धक्का बसल्याचेही ममतांनी सांगितले.

ट्रेनी डॉक्टरच्या पालकांनीही रुग्णालयातीलच कुणीतरी या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा दावा केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती ममतांनी दिली. आम्ही अधिष्ठाता, विभाग प्रमुख, वैद्यकीय अधिक्षकांना कामावरून हटवले आहे, असेही त्या म्हणाल्या.

Mamata Banerjee
IAS Kumar Ravi : दिवसभर मुख्यमंत्र्यांसोबत फिरले IAS अधिकारी अन् सायंकाळी थेट मंत्रालयात बदली...

दरम्यान, ममतांच्या डेडलाईनवर बोलताना पोलिस आयुक्त विनीत गोयल म्हणाले, गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. पुढील चार-पाच दिवसांत यातील इतर दोषींना पकडले जाईल. आम्ही हेल्पलाईन सुरू केली आहे. कुणावर संशय असल्यास त्यावर डॉक्टर माहिती देऊ शकतात. त्यांचे नाव गुपित ठेवले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

या गुन्ह्यात रुग्णालयातील कर्मचारी संजोय रॉय याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातील शिकाऊ डॉक्टरांच्या संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com