Shyama Prasad Mukharjee: 'एक देश, एक संविधान' याचे कैवारी शामाप्रसाद मुखर्जी...", इंडिगोच्या विमानात झाली उद्घोषणा

Shyama Prasad Mukharjee: काँग्रेसच्या नेत्यानं या संदर्भात ट्विट केलं असून नेमकं काय घडलं याची त्यातून माहिती दिली.
Shyama Prasad Mukherjee
Shyama Prasad Mukherjee
Published on
Updated on

Shyama Prasad Mukharjee: केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारचा 'एक देश आणि एक....' या अजेंड्यावर मोठा भर आहे. 'वन रँक, वन पेन्शन', 'वन नेशन, वन इलेक्शन', 'वन नेशन, वन टॅक्स' असे अनेक धोरणात्मक निर्णय सरकारनं आजवर घेतले आहेत. त्यातच आता आणखी एका कार्यक्रमाची भर पडली आहे. यामध्ये 'एक देश, एक संविधान' आणि त्याचे कैवारी शामाप्रसाद मुखर्जी अशी नवी घोषणा तयार करण्यात आली आहे. ही उद्घोषणेच्या रुपात इंडिगोच्या विमानातून ऐकायलाही मिळाली, असं ट्विट काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलं आहे.

श्रीनेत यांनी काय केलंय ट्विट?

तासाभरापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये सुप्रिया श्रीनेत म्हणतात, "नुकतेच आम्ही इंडिगोच्या विमानातून उतरलो, तेव्हा तिथं घोषणा झाली की 'एक राष्ट्र, एक संविधानाचे चॅम्पियन....श्यामा प्रसाद मुखर्जी यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो". पण आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की हे खोटं आहे. मुखर्जी यांनी आणि त्यांचे सहकारी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात पण त्यांचे पुतळे आणि आपल्या संविधानाच्या प्रती त्यांनी जाळल्या होत्या"

Shyama Prasad Mukherjee
Farmer Loan Waive: शेतकऱ्यानं तीन एकरात पेरलं भाजपचं बियाणं, पिकही उगवलं! विदर्भातला शेतकरी राज्यात ठरला चर्चेचा विषय

कोण आहेत श्यामा प्रसाद मुखर्जी?

श्यामा प्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. याच जनसंघाचं रुपांतर पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये झालं. म्हणजेच भाजपचे मूळ संस्थापक असंही त्यांना संबोधलं जातं. त्यांचा जन्म ६ जुलै १९०१ रोजी झाला होता. त्यामुळं दोनच दिवसांपूर्वी त्यांची जयंती भाजपच्यावतीनं साजरी करण्यात आली होती. यानिमित्तच विमानात ही उद्घोषणा करण्यात आली असावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com