
Operation Sindoor Debate: लोकसभेत सध्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असून सरकारच्यावतीनं संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. याप्रश्नांपैकी दोन प्रश्नांना राजनाथ यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की, कोणाच्याही दबावाखाली भारत सरकारनं शस्त्रसंधी केलेली नाही. तसंच ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरुच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
१० मेच्या सकाळी जेव्हा भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या मल्टिपल एअर फिल्डवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्ताननं हार पत्करली आणि आपल्या डीएमओशी चर्चा करुन हे आता थांबवा अशी विनंती केली. त्यानंतर ही शस्त्रसंधी भारतानं याच अटीवर स्विकारली की हे ऑपरेशन सिंदूर तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात येईल. त्यामुळं हे ऑपरेशन अद्याप समाप्त झालेलं नाही, जर पाकिस्तानकडून भविष्यात कोणताही चुकीचं साहस केलं गेलं तर हे ऑपरेशन पुन्हा एकदा सुरु होईल, असं आश्वासनं मी सभागृहाला देतो.
पाकिस्तानची ही हार ही केवळ सामान्य हार नव्हती तर सैन्यबल आणि मनोबल दोन्हींची हार होती. पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओना विनंती केली हल्ले रोखण्याची विनंती केली. त्यानंतर १२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये औपचारिक चर्चा झाली त्यानंतर दोन्ही पक्षांनी सैन्य कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. या ऑपरेशनमध्ये आपल्या जवानांचं काहीही नुकसान झालेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.