Military Strikes : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून मोठी घोषणा; लष्कराला दिले सर्वाधिकार

Background of Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ उपस्थित होते.
Indian Air Force conducts precision strikes during Operation Sindoor, targeting terrorist infrastructure in Pakistan-administered regions.
Indian Air Force conducts precision strikes during Operation Sindoor, targeting terrorist infrastructure in Pakistan-administered regions. Sarkarnama
Published on
Updated on

Pakistan's Response to the Operation : पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला असून भारताने एकप्रकारे युध्दाची चिथावणी दिल्याचा दावा पाक सरकारने केला आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन पाकिस्तान सरकारकडून जारी करण्यात आले असून कारवाईबाबत लष्कराला सर्वाधिकार दिल्याची मोठी घोषणाही करण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ, जनरल साहीर शमशाद मिर्झा, आयएसआयचे डीजी जनरल असीम मलीक आणि लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तसंस्थेने या बैठकीबाबत माहिती दिली आहे.

Indian Air Force conducts precision strikes during Operation Sindoor, targeting terrorist infrastructure in Pakistan-administered regions.
Operation Sindoor Impact : ती 9 ठिकाणेच का? हल्ल्यांशी काय होता संबंध? गुप्तचर यंत्रणांनी मोहिम फत्ते केली...

पाकिस्तान सरकारकडून या बैठकीबाबत अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारताच्या एअरस्ट्राईला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला असून याबाबत कारवाईसाठी लष्कराला सर्वाधिकार दिले आहेत. भारताच्या या कृतीचा संपूर्ण पाकिस्तान निषेध करत असून पाकिस्तान लष्कराच्या कारवाईचे कौतुकही करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा कांगावाही पाकिस्तानने केला आहे. भारताच्या य कृतीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेत भारताला त्यासाठी जबाबदार धरावे, अशी अपेक्षाही घाबरलेल्या पाकने व्यक्त केली आहे. पाकिस्तानला आत्मसन्मानासह शांतता हवी असून कोणत्याही प्रकारची घातक कृती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही पाकने दिला आहे.

Indian Air Force conducts precision strikes during Operation Sindoor, targeting terrorist infrastructure in Pakistan-administered regions.
Operation Sindoor Live : 25 मिनिटांत 9 कॅम्प उध्वस्त; 2 महिला अधिकाऱ्यांनी VIDEO दाखवत सांगितली ऑपरेशन सिंदूरची ‘A to Z’ कहाणी...

दरम्यान, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. बहुतेक तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. पहलगाम हल्ला असो की मुंबई हल्ला अशा अनेक हल्ल्यातील दहशतवाद्यांना यातील काही केंद्रांवरच हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. याबाबतची माहिती पुराव्यानिशी भारताकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com