Indian Army update : आम्ही पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे..! भारतीय लष्कराचा ‘पाक’ला कडक संदेश

Background of Operation Sindoor : भारतीय वायूसेनेचे ऑपरेशन महासंचालक एअर मार्शल यांनी सोमवारी पाकला कडक शब्दांत इशारा दिला आहे.
Indian Army
Indian ArmySarkarnama
Published on
Updated on

India Vs Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी अद्याप तणाव निवळलेला नाही. पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्यास भारतीय लष्कराकडून त्याला यापूर्वीपेक्षा अधिक आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाणार आहे. याबाबतचे स्पष्ट संकेतच आज लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आले. आम्हाला पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे प्रत्त्युत्तर देऊ, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.

भारतीय वायूसेनेचे ऑपरेशन महासंचालक एअर मार्शल यांनी सोमवारी पाकला कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारताचा लढा दहशतवाद्यांविरोधा आहे. पाकिस्तानने स्वत:हून यात उडी घेतली. हे एक वेगळ्या प्रकारचे युध्द होते. देव न करो, पण पुन्हा असा संघर्ष झाला तर तो मागच्यावेळपेक्षा अधिक वेगळा असेल, अशा स्पष्ट शब्दांत भारती यांना पाकला संदेश दिला आहे.

Indian Army
Breaking News : पंतप्रधान मोदी आज रात्री कोणती मोठी घोषणा करणार? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच येणार समोर...

पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्याचे धाडस केले तर आम्ही त्यावर पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे हल्ला करू शकते, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, भारतीय एअर डिफेन्स यंत्रणेची क्षमता यावेळी सिध्द झाली आहे. ही यंत्रणा अभेद्य असूनही कुणीही पार करू शकत नाही. भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान पलटवार करणार, अशी शक्यता होती. त्यामुळे आम्ही पूर्ण सज्ज होतो, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

भारतीय लष्कराने सीमेवर तीनस्तरीय सुरक्षा कवच सज्ज ठेवले होते. त्यामुळे पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तरी या तीन स्तरांतून तो पार होणार नाही, हे निश्चित होते. त्याप्रमाणे पाकिस्तानेच ड्रोन व मिसाईलचे हल्ले परतवून लावण्यात आले. पाकिस्तानने भारतीय लष्कराचे तळ टार्गेट केले होते. पण एकही तळापर्यंत पोहचताही आले नाही, असेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Indian Army
Breaking News : पंतप्रधान मोदी आज रात्री कोणती मोठी घोषणा करणार? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पहिल्यांदाच येणार समोर...

याउलट भारतानेच पाकिस्तानातील महत्वाचे हवाई तळ उध्वस्त केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. त्याचे व्हिडीओही यावेळी दाखविण्यात आले. भारतीय हवाई दलाची एक महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व भारतीय पायलट सुरक्षित असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com