
Masood Azhar's Family Casualties in Bahawalpur : भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करत त्यांचे ठावठिकाणे उध्वस्त केले आहेत. या हल्ल्यामध्ये जवळपास 70 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या मसूदच्या पूर्ण कुटुंबाचाच खात्मा झाला आहे. त्यानेच याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांमुळे खळबळ उडाली आहे.
भारताने बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानाती दहशतवाद्यांचे नऊ तळ टार्गेट केले. यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. त्यातच पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि अत्यंत विश्वासू असलेल्या चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये सुभान अल्लाह मदरसाही भारताकडून उध्वस्त करण्यात आला आहे. याच मदरशामध्ये मसूदचे कुटुंब होते. जैश-ए-मोहम्मदने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, या हल्ल्यात मसूदची मोटी बहीण आणि तिचा पती, मसूदचा भाचा आणि त्याची पत्नी, एक भाची आणि तिच्या कुटुंबातील पाच मुलांचा मृत्यमुखी पडलेल्यांमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे मसूदचा एक अत्यंत जवळचा सहकारी आणि त्याची आई तसेच इतर दोन निकवर्तीय मारले गेल्याचे सांगण्यात आले आहे.
कुटुंबातील 10 सदस्यांचा खात्मा झाल्यानंतर मसूदने केलेले विधानही चर्चेत आले आहे. या हल्ल्यात मीही मारला गेलो असतो तर बरं झालं असतं, असे मसूदने म्हटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताने मसूदला आतापर्यंत सर्वात मोठा दणका दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूदच्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा समावेश होता.
मसूद अजहरला 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स विमानाचे अपहरण केल्यानंतर यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी जेलमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने बहावलपूर येथे जैशचा तळ बनवला होता. संयुक्त राष्ट्राने 2019 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. 2001 मधील भारतीय संसदेवरील हल्ल्यामागे तो मास्टरमाईंड होता. तसेच 2000 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर झालेला हल्ला, 2016 पठाणकोट हल्ला तसेच 2019 पुलवामा हल्लाही त्यानेच घडवून आणला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.