
PM Modi explains Operation Sindoor:पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले, त्यानंतर सोमवारी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला.
भारत-पाक तणावसह अनेक महत्वाच्या मुद्यांवर मोदींनी देशवासियांना माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय? हे मोदींनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. तसेच ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्याबद्दलही भाष्य केले.
ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा, ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेलं पाहिलं आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला.
दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल”, असेही मोदी म्हणाले. आपल्या देशातील बहिणी, मुली यांच्या सिंदूर नष्ट करणाऱ्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरुच राहील, असे मोदी म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, वर्ग, पक्ष एका सुरात दहशतवादाच्या विरोध कठोर कारवाईसाठी एकजूटला. आपण दहशतवाद्यांना मातीत घालण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सुट दिली.
आज प्रत्येक दहशतवादी, दहतवाद्यांचं प्रत्येक संघटनेला कळून चुकलंय की, आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय असतो, होतो. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे,असे मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, त्याने देश आणि जगाला हादरवलं होतं. सुट्टी घालवणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारून कुटुंबासमोर, मुलांच्यासमोर मारणं हा दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता. क्रुरता होती. देशाच्या सद्भभाव तोडण्याचा हा प्रयत्न होता. माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या ही पीडा मोठी होती”, असेही मोदी म्हणाले.
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक केले. यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केले. त्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे अनेक एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल एक मोठे विधान सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय, यापुढे पाकिस्तान काय भूमिका घेतो, कसा वागतो हे पाहणार आहोत, असा सूचक इशारा मोदी यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.