Vyomika Singh Controversy : सोफिया कुरेशीनंतर आता विंग कमांडर व्योमिका सिंगबद्दल वादग्रस्त विधान, खासदाराने थेट जातच काढली, म्हणाले, 'राजपूत नाही...'

Ram Gopal Yadav yomika Singh: रामगोपाल यादव म्हणाले, सैन्य लढत होते आणि भाजपचे मंत्री सोफिया कुरैशीला शिवीगाळ करत होते. पण व्योमिका सिंग कोन आहे हे माहीत नव्हते.
Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika Singh
Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika SinghSarkarnama
Published on
Updated on

Ram Gopal Yadav News : पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याची कामगिरी माध्यमांसमोर सांगण्याचे काम लेफ्टनंट सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केले. भाजपचे मध्यप्रदेशातील मंत्र्याने सोफिया यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामगोपाल यादव यांनी व्योमिका सिंग यांची थेट जातच काढली.

रामगोपाल यादव म्हणाले, सोफिया कुरैशी मुस्लिम असल्याने त्यांना शिव्या देण्यात येत आहे. तर, विंग कमांडर व्योमिका सिंह यांना राजपूत समजून काही बोलले जात नाही. मात्र, व्योमिका या राजपूत नाही त्या हरियाणामधील 'जाटव चमार' आहेत.

Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika Singh
Andhra Pradesh Capital Amaravati: चंद्राबाबूचं स्वप्न पूर्ण झालं! आता राजधानी म्हणून अमरावती विकासाचे केंद्र म्हणून पुढे यावं...

'दुष्टासोबत दुष्टासारखेच वागले पाहिजे. शस्त्रसंधी झाली तेव्हा पाकिस्तान थांबेल असे सगळ्यांना वाटत होते. रोज आंतकवाद्यांना मारले जात आहे. आंतकवादी पाकिस्तामधून येत आहेत पण हे लोक (भाजप) तिरंगा यात्रा काढत आहेत. ते फक्त निवडणुकीसाठी सगळं काही करत आहेत', अशी टीका देखील भाजपचे नाव न घेता रामगोपाल यादव यांनी केली.

भाजपच्या लोकांकडून सैफियाला शिवीगाळ

रामगोपाल यादव म्हणाले, सैन्य लढत होते आणि भाजपचे मंत्री सोफिया कुरैशीला शिवीगाळ करत होते. पण व्योमिका सिंग कोन आहे हे माहीत नव्हते. एअर ऑपरेशनचे इंचार्ज एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांच्या विषयी देखील माहिती नव्हते. नाहीतर यांना देखील शिव्या दिल्या असत्या, अशी टीका देखील यादव यांनी भाजपच्या मंत्र्यावर केली.

सैन्याच्या यशाला भाजप स्वतःचे यश सांगते

'व्योमिका सिंग हरियाणाची जाटव चामर आहे. तर एअर मार्शल भारती पूर्णियाचे यादव आहेत. एकीला मुस्लिम समजून शिव्या दिल्या तर एकीला राजपूत समजून दिल्या नाहीत. भारती यांच्या विषयी त्या लोकांना माहिती नव्हते मात्र पेपरमध्ये आल्या ते आता विचार करत बसले आहेत. त्यांची मानिसकताच खराब आहे. सैन्याचे यश सांगण्यापेक्षा हे आपलेच यश सांगत आहेत', अशी टीका देखील भाजपचे नाव न घेता यादव यांनी केली.

Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika Singh
Donald Trump : सीजफायरच्या वक्तव्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न, 'आधी म्हणाले, माझ्यामुळे अन् आता मी फक्त...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com