Operation Sindoor debate : 'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेत चर्चेआधी शशी थरूर अन् राहुल गांधींचे ‘मौन व्रत’; नेमकं काय घडलं?

Shashi Tharoor's Stand Ahead of the Debate : एरव्ही संसदेच्या आवारात मीडियाशी बोलताना राहुल गांधी नेहमीच तयार असतात. मात्र, आज त्यांनीही मौन व्रत पाळल्याचे दिसले.
Shashi Tharoor, Rahul Gandhi
Shashi Tharoor, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi’s Strategic Silence in Parliament : संसदेमध्ये आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. मात्र, बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दोनदा तहकुब करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांकडून अनेक नेते बोलणार आहेत. मात्र, त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने परदेशात विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळे पाठवली होती. त्यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करत होते. तेव्हापासून काँग्रेस आणि थरूर यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. थरूर यांच्याकडून सातत्याने मोदी सरकारचे कौतुक केले जात असल्याने काँग्रेसमधील नेत्यांकडून टीका होत होती.

आता आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार असली तरी वक्त्यांच्या यादीमध्ये मात्र थरूर यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थरूर संसदेत दाखल झाल्यानंतर त्यांना मीडियाने याबाबत विचारले असता थरूर केवळ ‘मौन व्रत’ एवढेच बोलले आणि तिथून काढता पाय घेतला. यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.

Shashi Tharoor, Rahul Gandhi
Jagdeep Dhankhar : धनखड यांनी राजीनामा दिला नसता तर विपरीत घडलं असतं! सरकारने केली होती पूर्ण तयारी...

थरूर यांनी जाहीरपणे मौन व्रत असल्याचे सांगत न बोलण्याचे संकेत तर दिले पण दुसरीकडे राहुल गांधींनीही मीडियाशी बोलणे टाळले. सभागृहाच कामकाज दुपारी १२ नंतर तहकुब झाल्यानंतर राहुल गांधी व प्रियांका गांधी इतर नेत्यांसह सभागृहातून बाहेर आले. यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींनी घेरत काही प्रश्न विचारले.

Shashi Tharoor, Rahul Gandhi
Jagdeep Dhankhar : धनखड यांच्याबाबत ‘ती’ चूक भाजपला चांगलीच महागात; आता 'स्ट्रॅटेजी'च बदलावी लागणार...

मीडियाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते, पण राहुल गांधी यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ते बराच वेळ केवळ मोबाईलमध्ये बघत राहिले. शेजारी उभ्या असलेल्या प्रियांका गांधीही बोलल्या नाहीत. मी संसदेतच बोलेन, असे राहुल यांनी स्पष्टपणे सांगितले. एरव्ही संसदेच्या आवारात मीडियाशी बोलताना राहुल नेहमीच तयार असतात. मात्र, आज त्यांनीही मौन व्रत पाळल्याचे दिसले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com