Vijay Shah SIT probe: सुप्रीम कोर्टानं लाज काढल्यानंतर भाजप मंत्र्यांची तीन अधिकारी करणार कसून चौकशी

MP Police SIT to probe BJP leader Vijay Shah's remarks on Col Sofiya Qureshi: कोर्टानं सोमवारी सकाळी विजय शाह यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन झापलं होते. शाह यांनी केलेले कृत्य हे लाजीरवाणे असल्याचे सांगत शाह यांना कोर्टानं त्यांना खडसावले होते.
Vijay Shah SIT probe
Vijay Shah SIT probeSarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor News: ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे. या प्रकरणाची चौकशी आता एसआयटी करणार आहे. चौकशीसाठी सोमवारी रात्री उशीरा तीन सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

सोमवारी सकाळी कोर्टानं विजय शाह यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन चांगलेच झापलं होते. शाह यांनी केलेले कृत्य हे लाजीरवाणे असल्याचे सांगत शाह यांना कोर्टानं त्यांना खडसावले होते.

शाह यांच्या वकिलाने सांगितले की शाह यांनी माफी मागितली आहे. याबद्दल न्यायालयाने त्यांना फटकारले. न्यायालयाने म्हटले की, तुम्ही लोकांसमोर पूर्णपणे उघडे पडला आहात. शाह हे सार्वजनिक व्यक्ती आहात. बोलताना त्यांनी शब्दांचा विचार केला पाहिजे, असे सांगत याप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

Vijay Shah SIT probe
BJP Nagpur: ED लावा अन् वडेट्टीवारांचे तोंड बंद करा; भाजपचे माजी खासदार चिडले

एसआईटीमध्ये पोलिस महानिरीक्षक प्रमोद वर्मा, उपमहानिरीक्षक कल्याण चक्रवर्ती आणि पोलिस अधिक्षक वाहिनी सिंह यांचा समावेश आहे. कोर्टानं सोमवारी सकाळी मध्य प्रदेशाचे पोलिस महासंचालकांना मंगळवारपर्यंत सनदी अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला होता.

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाह यांच्याबाबत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी भाजप नेता विजय शाह हे आमच्या पार्टीत असते तर आम्ही त्यांनी कायम स्वरुपी पक्षातून काढून टाकले असते, असे म्हटलं आहे.

Vijay Shah SIT probe
भुजबळ ठरले मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ मंत्री! सरकारमध्ये पुन्हा एन्ट्री; असा आहे राजकीय प्रवास

काय म्हणाले होते विजय शाह

एका कार्यक्रमात कुरेशी यांच्याविरोधात शाह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी, ज्या दहशतवाद्यांनी आमच्या महिलांचे कुंकू पुसले, ज्यांनी आमच्या पर्यटकांना मारले, आम्ही त्यांच्याच बहिणीला त्यांच्याकडे पाठवले आणि त्यांना ठार मारले. दहशतवाद्यांनी आमच्या हिंदूंचे कपडे उतरवून मारले त्यांना मोदींनी त्यांच्या बहिणीला पाठवून उद्धवस्त केले. मोदी कपडे त्यांचे काढू शकत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या (दहशतवाद्यांच्या) समुदायातील एका बहिणीला पाठवून धडा शिकवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com