
Panaji News : गोव्यात सावंत सरकार अपयशी ठरले असून सरकारची कामगिरी सुमार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सरकारला घेरण्यासाठी आता विरोधकांनी विधानसभा अधिवेशनासाठी रणनीती निश्चितही केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वात विरोध एकत्र आले असून आमदारांनी एक बैठक देखील घेतली. या बैठकीला आलेमाव यांच्यासह गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्ता, कार्लुस आल्मेदा, ‘आप’चे वेन्झी व्हिएगस उपस्थित होते. दरम्यान ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांच्या उपस्थितीवरून शंका व्यक्त करण्यात आली.
गोव्यात सध्या भाजपचे सरकार असून त्याचे नेतृत्व मुख्यमंत्री प्रमोद सावंत करत आहेत. पण हे सरकार अपयशी ठरले आहे. यावरून विरोधकांनी मुठ बांधत सरकारविरोधात बंड करण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे विरोधक आमदारांची बैठक झाली. यावेळी मात्र जे विरोधक एकत्र आलेत त्यांच्यातच एकवाक्यता नसल्याचे आता समोर आले आहे.
या बैठकीत ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर हे उपस्थित नव्हते. यावरून ते विरोधकांसोबत आहेत की नाही अशी शंकाच उपस्थित केली जात होती. यावर राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक असे दोनच गट असतात आणि ते विरोधक आहेत. तिसरा गट हा नसतो असे आलेमाव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांच्या आघाडीतून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) बाहेर पडला. याबाबत पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी शुक्रवारी (ता. 25) दुपारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषद घेत घोषणा केली. तर आता येत्या विधानसभा निवडणुकीत आरजी निवडक जागा लढविणार असल्याचेही माहिती परब यांनी दिली होती.
यावेळी विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी, अधिवेशनावरून सरकारवर हल्लाबोल करताना, केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे म्हटले आहे. तर अशा या थट्टेत विरोधकांनी सहभागी होऊ नये, असे आपल्याला वाटतं असल्याचे ते म्हणाले. मात्र, आता विरोधी पक्षच यात सहभागी होणार असल्याचे आपणतर काय करणार? मलाही सहभागी व्हावं लागणार असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.