Parliament Monsoon Session : गांधींच्या पुतळ्याजवळ खासदारांनी रात्र काढली जागून ; मोदींच्या विरोधात काँग्रेस, आप आक्रमक

Parliament News Update : सोमवारची रात्र त्यांनी संसद भवनाच्या गवतावर काढली.
Parliament Monsoon Session
Parliament Monsoon Session Sarkarnama
Published on
Updated on

Opposition MPS Protest Outside Parliament : मोदी सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (सोमवारी) मणिपूर हिंसाचारावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा विस्कळीत झाले. संसदेत आणि संसदेच्या बाहेरही विरोधी पक्षाचे आंदोलन सुरु आहे.

राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळानंतर आम आदमी पार्टीचे (आप) खासदार संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या कारवाईच्या विरोधात खासदारांनी संसदेबाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. सोमवारची रात्र त्यांनी संसद भवनाच्या गवतावर काढली. आजही (मंगळवारी) आंदोलन सुरु आहे.

आप आणि काँग्रेसचे खासदारांनी सोमवारी रात्री 'इंडिया फॉर मणिपुर'चे फलक घेऊन मोदी सरकारच्या विरोधातीव आंदोलन तीव्र केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी आप आणि काँग्रेच्या खासदारांवर निशाणा साधला आहे. चर्चेतून पळून जाण्यासाठी या खासदारांनी हा प्रकार केला असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला आहे.

Parliament Monsoon Session
Anna Hazare On Manipur Issue: आशेचे दिवे पुन्हा पेटले, पुन्हा मशाल पेटवा ! ; अण्णा हजारेंना ठाकरे गटाचे साकडे

मणिपूर हिंसाचारावर चर्चा करावी, यासाठी खासदार संजय सिंह यांनी सभापती जगदीप धनखड यांच्या आसनाजवळ जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली. धनखड यांनी त्यांना आपल्या जागेवर परत जाण्यास सांगितले, परंतु संजय सिंह यांनी ते मान्य केले नाही. धनखड यांनी संजय सिंह यांचे नाव घेत इशारा दिला. तरीही संजय सिंह यांनी सभापतींच्या व्यासपीठाजवळ उभे राहून वाद सुरूच ठेवला. यानंतर धनखड यांनी सरकारला संजय यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आणण्यास सांगितले. मंत्री पियुष गोयल यांनी ठराव आणून त्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे.

Parliament Monsoon Session
Shinde Fadnavis Digital Advertisement : सरकार चालवायचे तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी ; अजितदादांचं काय ?
  • पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात 17 बैठका होणार आहेत.

  • केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात 31 विधेयके आणत आहे.

  • 21 नवीन विधेयके आहेत, तर 10 विधेयके संसदेच्या एका सभागृहात आधीच मांडण्यात आली आहेत.

  • दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगशी संबंधित अध्यादेश हे सर्वाधिक चर्चेत असलेले विधेयक आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com