Anna Hazare On Manipur Issue: आशेचे दिवे पुन्हा पेटले, पुन्हा मशाल पेटवा ! ; अण्णा हजारेंना ठाकरे गटाचे साकडे

Manipur violence : अण्णांनी आंदोलन पुकारावं. मोदी सरकारच्या कामांवर बोलावं..
anna hajare
anna hajareSarkarnama
Published on
Updated on

Manipur : मणिपूरमधील हिंसाचारावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मणिपूरच्या दुर्घटनेवर दोन दिवसांआधी अण्णांनी मोदी सरकारला खडसावले आहे. मणिपुरमध्ये सुरु असलेलेल्या हिंसाचारावर विरोधक आक्रमक झाले असताना यात अण्णांनी 'एन्ट्री' घेतली आहे.

अण्णांच्या या भूमिकेवरुन ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'तून अण्णांना साकडे घातले असून अण्णांनी पुन्हा मशाल पेटवावी, असे आवाहन ठाकरे गटानं केलं आहे. "मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले. म्हणून आशेचे दिवे पुन्हा पेटले, इतकेच! अण्णा, हाती पुन्हा एकदा मशाल घ्या! पेटवा ती मशाल," अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे गट) केली आहे.

“महाराष्ट्रात ‘युती’चे सरकार असताना मंत्र्यांच्या विरोधात उपोषण करणारे हेच अण्णा आज दादा भुसे, अब्दुल सत्तार, मुश्रीफ, प्रफुल पटेल, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल अशांच्या घोटाळ्यांची दखल घेत नाहीत व एकदम मणिपुरातील हिंसाचारावर बोलू लागतात. पंतप्रधान मोदी हे ज्याप्रमाणे राष्ट्रीय समस्यांचा त्याग करून विश्वगुरू झाले तसे आपल्या अण्णांचे झाले आहे काय?” असा खोचक सवाल ठाकरे गटानं अण्णांना केला आहे.

anna hajare
Shinde Fadnavis Digital Advertisement : सरकार चालवायचे तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी ; अजितदादांचं काय ?

अण्णा हजारे यांनी काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला होता. आताही अण्णांनी आंदोलन पुकारावं. मोदी सरकारच्या कामांवर बोलावं, असं आवाहन सामनाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केलं आहे.

“अण्णा हजारे यांनी अचानक अशी मागणी केली की, मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना फाशी द्यावी. मणिपूरचे प्रकरण गंभीर आहे व सरकारने त्याबाबत चालढकल करू नये, असे अण्णांचे म्हणणे आहे. अण्णांचे काहीच चुकले नाही. अण्णा जागे आहेत व त्यांचे देशातील घडामोडींवर लक्ष आहे हे यामुळे दिसले. मणिपूरच्या नग्नसत्यावर सारे जग थुंकते आहे; पण त्याची पर्वा ना आपल्या पंतप्रधान मोदींना, ना त्यांच्या बकध्यान करणाऱ्या सरकारला. त्यामुळे इतक्या दिवसांनी जागे होऊन अण्णांनी काय मिळवले?” असा प्रश्न या निमित्ताने ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

anna hajare
Chandrakant Patil Meet Deepak Mankar: चंद्रकांतदादा- दीपकभाऊंच्या भेटीने पुण्यात उलथापालथी ; कोथरूडमध्ये मैत्रीचे नवे पर्व...

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  • भारतीय जनता पक्षाला अण्णांनी वरदान दिले आहे? तुम्ही हवा तितका भ्रष्टाचार करा. मी तुमच्या घोटाळ्यांकडे अजिबात पाहणार नाही. भाजपाने जे वॉशिंग मशीन निर्माण केले आहे त्यास अण्णांचा आशीर्वाद आहे का?

  • “महाराष्ट्रात ‘युती’चे सरकार असताना मंत्र्यांच्या विरोधात उपोषण करणारे हेच अण्णा आज दादा भुसे, अब्दुल सत्तार, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल अशांच्या घोटाळ्यांची दखल घेत नाहीत व एकदम मणिपुरातील हिंसाचारावर बोलू लागतात. पंतप्रधान मोदी हे ज्याप्रमाणे राष्ट्रीय समस्यांचा त्याग करून विश्वगुरू झाले तसे आपल्या अण्णांचे झाले आहे काय?

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com