Shrikant Shinde In Parliament: 'यूपीए' नावाची लाज वाटल्यानेच 'इंडिया' नाव ठेवले; श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

No-Confidence Motion Debate Updates: विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावर आणला आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama

Shrikant Shinde News : मणिपूरमध्ये मागील दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्या विरोधात विरोधी पक्षांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आला. या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत जोरदार चर्चा सुरु आहे. या अविश्वास प्रस्तावासंदर्भात बोलत असताना शिवसेनेचे (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) चे नाव घेतले की लोकांना फक्त घोटाळे आठवतात, त्यामुळे विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव बदलले असल्याचा खोचक टोला शिंदे यांनी लगावला.

या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात खासदार शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले. मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या (NDA) खासदारांची संख्या वाढली. यामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वाढ होऊन ही संख्या ४०० पार जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. जनतेचा विश्वास पंतप्रधान मोदींच्या सोबत आहे. तुमच्या विरोधात जनतेने दोनदा अविश्वास प्रस्ताव पारित केला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत लोक हॅट्रिक करणार आहेत.

Shrikant Shinde
Shrinivas Patil In Loksabha: श्रीनिवास पाटील सभागृहात आक्रमक; म्हणाले, आनेवाडी, तासवडे टोलनाके जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करा...

यांनी 'यूपीए'चे नाव बदलले कारण यांना त्या नावाची लाच वाटत होती. कारण 'यूपीए'चे नाव घेतले की लोकांना भ्रष्टाचार, घोटाळे आठवतात, असा चिमटा शिंदे यांनी विरोधकांना काढला. या घोटाळ्यांमुळेच लोकांनी २०२४ मध्ये काँग्रेसचा (Congress) हात सोडला आणि मोदींना पसंती दर्शवली. यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचे नाव 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलाएन्स' (इंडिया) असे नाव ठेवले. त्यांना वाटते नाव बदलले म्हणजे लोक निवडून देतील. एका व्यक्तीच्या विरोधात हे सगळे लोक एकत्र आले आहेत. ज्यांची काही नियत नाही, ज्यांचा कुणी नेता नाही, असे सगळे एकत्र आले आहेत.

Shrikant Shinde
Derek O Brien Suspended: संजय सिंहानंतर तृणमुल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांचेही निलंबन

विरोधकांच्या आघाडीमध्ये प्रत्येक नेत्याला पंतप्रधान व्हायचे आहे. 'अडला हरी गाढवाचे पाय धरी', मराठी म्हणीचा उल्लेख शिंदे यांनी केला. यांच्या टिमला कोणीच कॅप्टन नाही आणि यांना वडकप जिंकायचा आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांच्या आघाडीची खिल्ली उडवली. मणिपूरमध्ये जे काही घडत आहे, हे गंभीर आहे. त्यावर कारवाई होण्याची गरज असल्याचेही शिंदे म्हणाले. विरोधी पक्ष फक्त मणिपूरवर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com