Derek O Brien Suspended: संजय सिंहानंतर तृणमुल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांचेही निलंबन

Political News : सभापतींनी डेरेक ओब्रायन यांचे नाव दिल्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी राज्यसभेत ओब्रायन यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
 Derek O Brien Suspended
Derek O Brien SuspendedSarkarnama
Published on
Updated on

Derek O Brien Suspended: राज्यसभेतून विरोधकांना निलंबित करण्याचा सत्ताधारी पक्षांचा सपाटा सुरूच आहे.आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या निलंबनानंतर आता तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.सभागृहात असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. डेरेक ओब्रायनला उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

मणिपूर हिंसाचाराप्रकरणी टीएमसी खासदार थेट संजय संजय सिंह यांनी चर्चेची मागणी लावून धरली. यामुळे राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ओब्रायन यांना खडसावून खाली बसण्यास सांगितले. एवढे करूनही ओब्रायन यांनी त्यांच्या सूचना न ऐकल्यामुळे जगदीप धनखड यांनी त्यांना निलंबित केले.

 Derek O Brien Suspended
No-Confidence Motion History: 'या' पंतप्रधानांना सामोरं जावं लागलं होत अविश्वास ठरावला, सर्वात जास्त ठराव काँग्रेसच्या विरोधात..!

सभापतींनी डेरेक ओब्रायन यांचे नाव दिल्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी राज्यसभेत ओब्रायन यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला. "सभागृहाच्या कामकाजात सतत व्यत्यय आणणे, अध्यक्षांची अवज्ञा करणे आणि सभागृहात गोंधळ निर्माण करणे या कारणास्तव मी डेरेक ओब्रायन यांना उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडत आहे, ज्याला अध्यक्षांनी मंजुरी दिली."

यानंतर अध्यक्ष धनखड यांनी डेरेक ओब्रायन यांना सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश देत त्यांचे अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलं. त्यामुळे सभापती धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज तहकूब केले.

 Derek O Brien Suspended
Shetkari Sanghatna News: रघुनाथदादांचे निमंत्रण अन् के. चंद्रशेखर राव पुन्हा सांगलीत

या अधिवेशनात राज्यसभेतील सदस्याला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनाही राज्यसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरही चर्चा सुरू झाली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. गोगोई यांनीच लोकसभेत अविश्वास ठराव मांडला होता.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com