Shrinivas Patil In Loksabha: श्रीनिवास पाटील सभागृहात आक्रमक; म्हणाले, आनेवाडी, तासवडे टोलनाके जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करा...

Shrinivas Patil लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार पाटील यांनी महत्त्वाचे मुद्दे सादर करून सभागृहाच्या पटलावर ठेवले.
Nitin Gadkari, Shirnivas Patil
Nitin Gadkari, Shirnivas Patilsarkarnama

Lok Sabha Monsoon Session : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी व तासवडे टोलनाके जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करावेत, तसेच जिल्ह्यातील जनतेला त्यातून पूर्णतः सूट द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.

लोकसभेच्या Loksabha पावसाळी अधिवेशनात खासदार पाटील Srinivas Patil यांनी महत्त्वाचे मुद्दे सादर करून सभागृहाच्या पटलावर ठेवले. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गावर पडलेले खड्डे, संथगतीने सुरू असलेला खंबाटकी बोगदा, सहापदरीकरणाचे काम, प्रलंबित असलेले उड्डाणपूल, तसेच टोलनाक्याच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करत ही मागणी केली.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘सातारा लोकसभा मतदारसंघात आनेवाडी आणि तासवडे असे दोन टोलनाके आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कामाच्या निमित्ताने दिवसातून दोन-चार वेळा या दोन्ही टोलनाक्यांवरून जावे लागते. या दोन्ही टोलनाक्यांवर ७५ रुपयांपासून ४२५ रुपयांपर्यंतचा कर वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला आहे.

मात्र, वसूल केलेल्या कर उत्पन्नानुसार दिल्या जाणाऱ्या सुविधा मात्र, खूपच कमी आहेत. रुग्णसेवा, क्रेन, शौचालय, रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाश आणि इतर अत्यावश्यक सेवा वाढविण्याची गरज आहे. हे दोन्ही टोलनाके सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करण्याची गरज आहे.

Nitin Gadkari, Shirnivas Patil
Satara BJP News : उदयनराजेंनी केले सरकारचे अभिनंदन; म्हणाले, आता ‘इर्मा’ योजना अंमलात आणा...

तसे करता येत नसेल तर जिल्ह्यातील जनतेला या दोन्ही टोलनाक्यांवर टोलमध्ये संपूर्ण सूट दिली जावी. यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरील पुणे ते सातारा आणि सातारा ते कोल्हापूर या भागावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

प्राधान्याने खड्डे बुजवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे, तसेच रस्ता पूर्णपणे अपघातमुक्त करावयाचा असेल तर हे खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने बुजविणे गरजेचे आहे. खंडाळा तालुक्यातील पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपूल, तसेच वेळे येथे ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे. उड्डाणपुलांची कामे लवकर सुरू करावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली आहे.

Edited By : Umesh Bambare

Nitin Gadkari, Shirnivas Patil
Karad News : पृथ्वीराज चव्हाण संतापले! म्हणाले, हातगाडाधारकांना धमकावणाऱ्या गुंडांना खपवून घेणार नाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com