Opposition's INDIA : भाजपविरोधकांच्या गटाचं बारसं ; यापुढच्या निवडणुका 'UPA' नव्हे तर 'INDIA' नावाने लढवणार !

Opposition Meeting in Bengaluru : बंगळूरू येथील बैठकीतील मोठा निर्णय
Opposition Leaders in Bengluru
Opposition Leaders in BengluruSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Fight Between India Vs NDA : लोकसभेच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र आलेल्या भाजपविरोधकांनी आपल्या व्यूहरचनेत बदलाला सुरूवात करून सज्ज होत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी पहिल्या टप्प्यात विरोधकांनी जुन्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नाव खोडून 'इंडिया' (INDIA) अर्थात 'इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स' या नावावर मोहोर उठवली आहे. या नव्या प्रयोगातून आता मतदारांना भुरळ घालण्याचा विरोधी नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. (Latest Political News)

Opposition Leaders in Bengluru
Opposition Meeting News: विरोधकांची रणनीती ठरली? बंगळुरूमधील बैठकीत पंतप्रधानपदाबाबत खर्गेंचं मोठं विधान

बेंगळूरूत भाजपविरोधकांची दोन दिवसांची बैठक सोमवार (ता. १७)पासून सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आपल्या गटाचे नाव ठरवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी INDIA (इंडिया) या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्यास सर्व पक्षांनी अनुमोदन दिले. तर आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 'UNITED WE STAND...' अशी विरोधी आघाडीची टॅगलाइन असेल. नव्या आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि संयोजक म्हणून नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा आहे.

Opposition Leaders in Bengluru
Rahul Gandhi- Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची याचिका मंजूर; २१ जुलैला सुनावणी

भाजपविरोधकांच्या गटात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यासह इतर काही पक्षांनी नव्याने सहभाग घेतला आहे. बेंगळुरूत बैठकीत सुमारे २६ पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित लावली या नव्या गटाचे नाव बदलण्याची चर्चा सुरू होती. या बैठकीत नवीन नावावर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. यानुसार 'यूपीए' आता 'इंडिया' नावाने ओळखली जाणार आहे. या गटात २६ पक्षांचा सहभाग आहे.

Opposition Leaders in Bengluru
Opposition Leaders in BengluruSarkarnama

या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खर्गे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या रणनीतीवर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडीची रूपरेषा आणि सामायिक कार्यक्रमासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधत बेंगळुरू येथील सभेचा उद्देश देश, लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा असल्याचे सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com