Opposition Meeting News: विरोधकांची रणनीती ठरली? बंगळुरूमधील बैठकीत पंतप्रधानपदाबाबत खर्गेंचं मोठं विधान

Mallikarjun Kharge: बंगळुरूमध्ये आज 26 विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली.
Opposition Meeting
Opposition Meeting Sarkarnama
Published on
Updated on

Congress News: आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आगामी निवडणुकीत विरोधकांची रणनीती कशी असणार? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होत आहे. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक बैठक झाली होती. त्यानंतर विरोधक पुन्हा एकदा बंगळुरूमध्ये एकत्र आले आहेत.

आगामी निवडणुकीची रणनीती विरोधक ठरवत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानपदासंदर्भात मोठं विधान केलं आहे. खर्गे म्हणाले, "काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. या बैठकीच्या निमित्ताने आमची एवढीच भावना आहे की, संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करणं, असं त्यांनी म्हटलं आहे.

Opposition Meeting
Monsoon Session News : ` अहिर मी आज भविष्यवाणी करतो, तुम्हीही भाजपमध्ये याल`..

दरम्यान, आज होत असलेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीला देशातील तब्बल 26 विरोधी पक्ष उपस्थित होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेतेही या बैठकीला उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी असतानाच आत्तापासूनच राजकीय पक्ष अॅक्शन मोडवर आले आहेत. एकीकडे विरोधकांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे एनडीएच्या बैठका पार पडत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com