Omar Bin Laden : नेमका कोण आहे, 'ओसामा'चा मुलगा उमर बिन लादेन? ; एक चूक अन् फ्रान्सने उचललं 'हे' मोठं पाऊल!

Osama Bin Laden son Omar Bin Laden : जाणून घ्या, संपूर्ण माहिती आणि त्याने नेमकं काय केलं होतं?
Omar Bin Laden
Omar Bin LadenSarkarnama
Published on
Updated on

France government action against Omar Bin Laden : ओसामा बिन लादेनचा मुलगा उमर बिन लादेनला फ्रान्सने देशातून बाहेर हाकललं आहे. फ्रान्सचे गृहमंत्री ब्रूनो रिटेलो यांनी मंगळवारी सांगितले की, फ्रान्स अधिकाऱ्यांनी अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचा मुलगा उमर बिन लादेनला सोशल मीडियावर दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी हकालपट्टी केली आहे.

फ्रान्सच्या(France ) गृहमंत्र्यांनी मंगळवाीर म्हटले की, त्यांनी अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेनचा मुलगा उमर बिन लादेनच्या फ्रान्सला परत येण्याच्या सर्व प्रयत्नांविरुद्ध अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. गृहमंत्रालयानुसार उमर बिन लादेन फ्रान्सच्या नॉरमैंडी भागात राहत होता. मात्र फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी त्यास देश सोडण्याचे सांगितल्यानंतर, तो ऑक्टोबर २०२३मध्येच देश सोडून गेला आहे.

Omar Bin Laden
BJP sent jalebi for Rahul Gandhi : हरियाणा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने राहुल गांधींना पाठवली एक किलो जिलेबी!

अशातच फ्रान्सच नवीन गृहमंत्री बनलेल्या ब्रूनो रिटेलो यांनी एक्सवर लिहिले की, उमर बिन लादेन नॉरमैंडीच्या ओर्ने विभागात एका ब्रिटिश नागरिकाचा जोडीदार बनून राहत होता. त्यांनी सांगितले की उमर बिन लादेनने २०२३मध्ये आपल्या सोशल अकाउंटवर दहशतवादाचे समर्थन करणारी पोस्ट केली होती, ज्यामुळे त्याला देशाबाहेर केलं गेलं होतं.

रिटेलो यांनी सांगितले की, मी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा सर्वात मोठा मुलगा उमर बिन लादेनवर प्रशासकीय प्रतिबंध जारी करत आहे. उमर बिन लादेन जो अनेक वर्षांपासून ब्रिटिश नागरिकाच्या जीवनसाथीच्या रुपात ओर्न येथे राहत होता, त्याने २०२३मध्ये सोशल मीडियावर दहशतवादाशी निगडीत पोस्ट केली होती.

नेमका कोण आहे उमर बिन लादेन? -

सध्या ४३ वर्षीय असलेल्या उमर बिन लादेनचा जन्म सऊदी अरबमध्ये झाला होता आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आपल्या वडिलापासून दूर होण्याच्याआधी तो सूदान आणि अफगाणिस्तानातही(Afghanistan) राहिलेला आहे. नंतर तो २०१६मध्ये फ्रान्सच्या नॉरमैंडीमध्ये स्थायिक झाला, जिथे त्याने एक चित्रकार म्हणून आपलं करिअर घडवलं.

उमर बिन लादेन याने २००७मध्ये मीडियाचे लक्ष वेधून घेतल होतं, त्याने ब्रिटिश नागिरक जेन फेलिक्स-ब्राउनशी विवाह केला, जिने नंतर जैना मोहम्मद हे मुस्लिम नाव स्वीकारलं होतं, विशेष म्हणजे या दोघांच्या वयातही बरच अंतर होतं.

Omar Bin Laden
Gohana ka Jaleba : हरियाणात विधानसभा निवडणूक निकालाच्या चढ-उतारात 'गोहाना का जलेबा' ट्रेंडिंगमध्ये!

उमर आधी ब्रिटनमध्ये राहू इच्छित होता, परंतु ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याचा अर्ज स्वीकारला नव्हता. दहशतवादी ओसामा बिन लादेनचे जवळपास दोन डझन मुलं होती. त्याला २०११मध्ये पाकिस्तानात(Pakistan) अमेरिकी जवानांनी ठार केलं होतं. तर प्राप्त माहितीनुसार मागील आठवड्यातच उमर बिन लादेन त्याच्या फ्रान्स वापसीवर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठीची कायदेशीर लढाई हरला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com