
Indira Gandhi Paid with Her Life for the Decision : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी खळबळजनक विधान केले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार चुकीच्या पध्दतीने राबविण्यात आले. इंदिरा गांधी यांना याच चुकीची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागली, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या भूमिकाबाबत नुकतेच चिदंबरम यांनी केलेले विधान वादात सापडले होते. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थेट काँग्रेसवर निशाणा साधला होता. आता चिदंबरम यांनी 1984 अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारबाबत मोठे विधान केले आहे.
हिमाचल प्रदेशात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना चिदंबरम म्हणाले, ऑपरेशन ब्लू स्टार हा केवळ इंदिरा गांधी यांचा निर्णय नव्हता. यामध्ये लष्कर, पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारीही सहभागी होते. सर्वांनी मिळून सुवर्ण मंदिरात लष्कर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही यासाठी केवळ इंदिरा गांधी यांना दोषी धरण्यात आले.
मी कोणत्याही लष्करी अधिकाऱ्यांचा अवमान करत नाही. व तो निर्णय (ब्लू स्टार) सुवर्ण मंदिराला पुन्हा मिळविण्याची चुकीची पध्दत होती. त्याची किंमत इंदिरा गांधी यांना आपला जिवत गमावून चुकवावी लागली. काही वर्षांनी आम्ही सेन्याला बाहेरच ठेवून सुवर्ण मंदिराला पुन्हा मिळविण्यासाठी योग्य मार्ग दाखविला, असे चिदंबरम म्हणाले आहेत.
खलिस्तानच्या मागणीवरही चिदंबरम यांनी महत्वाचे भाष्य केले. ते म्हणाले, पंजाबमध्ये खलिस्तानची मागणी पूर्णपणे संपली आहे. ही मागणी आणि नारेबाजी जवळपास थांबली आहे. तिथली खरी समस्या आर्थिक स्थिती ही आहे. कारण लोक पंजाब सोडून विदेशात जात आहेत. तिथे सर्वाधिक अवैध प्रवासी पंजाबमधील असल्याचे चिदंबर म्हणाले आहेत.
दरम्यान, चिंदबरम यांच्या इंदिरा गांधींबाबतच्या विधानावरून काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. काँग्रेसमधील सुत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, चिदंबरम यांच्या विधानामुळे काँग्रेस नाराज आहे. नेतृत्वापासून सर्वसामान्य कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. पक्षाने सर्वकाही दिलेल्या अशा ज्येष्ठ नेत्याने बोलताना खबरदारी घ्यायला हवी. पक्षाची फजिती होईल, अशी विधाने सातत्याने करणे योग्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.