Refinery fire : खळबळजनक घटना : PM मोदी उद्घाटन करणार असलेल्या रिफायनरीला काही तास आधीच आग

Pachpadra refinery fire : आगीचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, धुराचे लोट पाहता ही आग मोठी असल्याचे सांगितले जात आहे.
Pachpadra refinery fire
Pachpadra refinery fireSarkarnama
Published on
Updated on

राजस्थानमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. राज्यातील बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथील रिफायनरीला आग लागली आहे.रिफायनरीतील एका युनिटमध्ये ही आग भडकल्याचे सांगितले जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

महत्वाचे म्हणजे, आग लागलेल्या रिफायनरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन केले जाणार आहे. त्याच्या काही तास आधीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, धुराचे लोट पाहता ही आग मोठी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राजस्थानातील ही रिफायनरी देशात सर्वात मोठी असल्याचा दावा केला जात आहे.मंगळवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचे सकाळी ११ वाजता लोकार्पण होणार असल्याने राजस्थान सरकार तसेच सुरक्षा यंत्रणांकडून जोरदार तयारी केली जात आहे. एकीकडे कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच ऱिफायनरीतील एका युनिटमध्ये धुराचे लोट उठले.

Pachpadra refinery fire
Modi Government news : PM मोदींचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागलेल्या नेत्यावर देशाची मोठी जबाबदारी

आग लागल्याचे समोर येताच सुरूवातीला रिफायनरीतील फायर सेफ्टी यंत्रणा कार्यान्वित करून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या. सध्यातरी आग आटोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.उद्घाटनाआधीच आग लागल्याने आता सुरक्षेचे प्रश्न उपस्थित राहिले आहेत.

Pachpadra refinery fire
MLC Election : विधानपरिषदेत पुण्याची लॉटरी लागणार? ‘या’ नेत्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय, नावे आली समोर...

प्रशासनाकडून तातडीने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. राजस्थानचे मुख्य सचिव घटनास्थळी दाखल झाले आहेत.राजस्थानातील या रिफायनरीसाठी तब्बल ७२ हजार कोटींची गुंतवणुक करण्यात आली आहे. राजस्थानच्या अर्थव्यवस्थेसाठी ही महत्वाची रिफायनरी मानली जात आहे. रोजगार तसेच गुंतवणुक वाढविण्याच्यादृष्टीने या रिफायनरीकडे पाहिले जात आहे. या योजनेमध्ये राज्य सरकारची २६ टक्के भागीदारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com