MLC Election : विधानपरिषदेत पुण्याची लॉटरी लागणार? ‘या’ नेत्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय, नावे आली समोर...

Maharashtra legislative council election aspirants pune: भाजपकडे सर्वाधिक पाच जागा असल्या तरी इच्छुकांची यादीही तितकीच मोठी आहे. पुण्यातून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे.
Maharashtra legislative council election aspirants Pune
Maharashtra legislative council election aspirants PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक यंदा पुण्यासाठी राजकीय ‘गेम चेंजर’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, सर्वच पक्षांनी इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यास पुण्यातून एकाच वेळी दोन ते तीन नवे आमदार विधानपरिषदेत झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २३ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. संख्याबळाच्या गणितानुसार, नऊपैकी पाच जागा भाजप, दोन शिवसेना, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी चुरस वाढणार हे निश्चित.

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी; आश्वासनांची कसोटी

भाजपकडे सर्वाधिक पाच जागा असल्या तरी इच्छुकांची यादीही तितकीच मोठी आहे. पुण्यातून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच वडगाव शेरीतून उमेदवारीपासून वंचित राहिलेले माजी आमदार जगदीश मुळीक यांनाही विधानपरिषदेत संधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात उतरते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याशिवाय, जिल्ह्यातील समीकरणे साधायची झाल्यास प्रदीप कंद आणि संग्राम थोपटे यांची नावेही चर्चेत आहेत.

Maharashtra legislative council election aspirants Pune
Women reservation : महिला आरक्षणावरून CM फडणवीसांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांपर्यंत पोहोचणार

शिवसेनेत ‘धक्कातंत्रा’ची शक्यता

शिवसेनेकडे असलेल्या दोन जागांपैकी किमान एक जागा पुण्याला मिळण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर असले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘धक्कातंत्रा’मुळे एखादे अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शर्यतीत रवींद्र धंगेकर, डॉ. रोहित टिळक यांच्यासह शिंदेंना सुरुवातीपासून साथ देणारे नाना भानगिरे हेही प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रवादीत एक जागा, इच्छुक अनेक

राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ एकच जागा असल्याने इच्छुकांची संख्या पाहता तिकीटासाठी मोठी चुरस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यातील संघटनात्मक ताकद कमी झाल्याची चर्चा असताना, पक्ष आता पुन्हा पुण्याकडे लक्ष केंद्रित करणार का, हा प्रश्न आहे. इच्छुकांच्या यादीत सुनील टिंगरे, सुभाष जगताप, दीपक मानकर, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील नाना काटे आणि योगेश बहल यांची नावे आघाडीवर आहेत. रूपाली पाटील यांनीही मागणी केली आहे.

Maharashtra legislative council election aspirants Pune
Maharashtra Government : धक्कादायक : नवीन उत्पन्न, रहिवास दाखल्यांबाबत अधिकारीच अंधारात; सरकारला खडबडून जाग, पुन्हा काढावा लागला आदेश...

आघाडीकडून अंधारेंची एंट्री?

महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानपरिषदेत न जाण्याचा निर्णय घेतल्यास, पक्षाच्या आक्रमक प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे नाव पुढे येऊ शकते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष पुण्याच्या वाट्याला आमदारकी टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या पक्षांमध्ये मोठमोठे दिग्गज आस लावून बसले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com