
India Pakistan News : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या भारताला पोकळ धमक्या सुरु झाल्या आहेत. त्यावरुन आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला अणवस्त्रांवरुन सुनावले आहे. ते परभणी येथील सभेत बोलत होते.
हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी यावेळी पाकिस्तानच्या बजेटवरुन खिल्ली उडवली. ते म्हणाले, पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये. तुमच्या देशाचं बजेट, आमच्या देशाच्या सैन्य बजेटच्या आसपासही नाही. पाकिस्तान वारंवार सांगते की, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन तेथील निर्दोष लोकांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही असं ओवैसी म्हणाले.
औवेसी पुढे म्हणाले, वेळेच्या हिशोबाने पाकिस्तान भारतापेक्षा अर्धातास मागे आहे. पण तसं पहायला गेलं तर पाकिस्तान भारतापेक्षा 50 वर्षांनी मागे आहे. अशाप्रकारे भारताच्या भूमीवर येऊन तुम्ही हल्ला केला. तुम्ही धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात. आयएसआयएसचा वारसा तुम्ही पुढे चालवत आहात, त्यामुळे आम्हाला शिकवू नका असं औवीसींनी पाकिस्तानला ठणकावलं.
ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, काश्मीर आमचे अभिन्न अंग आहे, तर तिथले काश्मिरी सुद्धा आमचं अभिन्न अंग आहेत. आपण काश्मिरींवर संशय घेऊ शकत नाही. एक काश्मिरी माणूस होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताणा आपले प्राण गमावले. अशा लोकांवर आपण संशय घेऊ नये. पाकिस्तानला आर्थिक दृष्टया कमजोर करण्यासाठी पंतप्रधानांनी पावलं उचलावीत अशी मागणी ओवैसी यांनी केली.
वक्फ संशोधन विधेयकाला समर्थन केल्याबद्दल ओवैसीनी अजित पवार, नितीश कुमार, जयंत चौधरी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका केली. मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेचे लोक त्यांना माफ करणार नाहीत असं ते म्हणाले. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. दर्गा, मस्जिद, कब्रस्तान, ईदगाह अशा सर्व जमीन बळकावण्यासाठी हा कायदा आणला गेला आहे असा आरोप औवेसींनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.