Vijay Wadettiwar: दंगली घडविण्यासाठीच भाजपला बदलायचा आहे इतिहास?

Vijay Wadettiwar ON NCERT Mughal Curriculum Change:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती वगळता सर्वांनीच या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर महायुती सरकारला हिंदीची सक्ती काढून टाकावी लागली होती. आता इतिहासावरून नवे राजकारण सुरू झाले आहे.
Congress leader Vijay Wadettiwar
Congress leader Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: काश्मीरमध्ये पर्यटकांवर फायरिंग झाल्यानंतर आता इतिहासाच्या पुस्तकातून मुस्लिम राजे आणि राजवटीचा इतिहास काढून टाकण्यात येणार आहे. इतिहास बदलला जात असल्याने काँग्रेस आणि विरोधीपक्षांतर्फे सत्ताधाऱ्यांवर टीका करणे सुरू झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी इतिहास पुसण्यापेक्षा इतिहास घडवण्याची ताकद दाखवावी असा टोला भाजपला लगावला.

भाजपचा इतिहास हा विषमतेचा आहे. तो त्यांना अभ्यासक्रमात मांडून दोन धर्मांमध्ये दंगली घडवायच्या असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मोठा वाद उफाळला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती वगळता सर्वांनीच या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर महायुती सरकारला हिंदीची सक्ती काढून टाकावी लागली होती. आता इतिहासावरून नवे राजकारण सुरू झाले आहे. राज्याच्या आणि देशातील शालेय पुस्तकात मुस्लिम राजवटीचा इतिहास मोठ्या प्रमाणात आहे. तो काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Congress leader Vijay Wadettiwar
Kolhapur BJP Politics: जुन्याच कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष पदाची संधी! माधुरी मिसाळांनी नव्यांना ठणकावले

वडेट्टीवार म्हणाले, "इतिहास हा घटनांची नोंद आणि साक्ष असते. भूतकाळात जे काही चांगले वाईट घडले त्याचा ठेवा इतिहासात असतो. मात्र भाजपला विषमतेच इतिहास मांडायचा आहे. जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, दंगली होतील असा नवा इतिहास अभ्यासक्रमात समावेश करायचा आहे. धर्मांधतेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार आहे.

Congress leader Vijay Wadettiwar
Pakistani Youtube Channels: मोदींचा डिजिटल स्ट्राईक! पाकिस्तानच्या16 यूट्यूब चॅनेलवर बंदी; क्रिकेटर शोएब अख्तरलाही दणका

काश्मीमरमध्ये दोनशे किलोमीटर आत घसून अतिरेकी आले. त्यांनी गोळीबार करून निरपराध पर्यटकांचा बळी घेतला. यावर केंद्र सरकार चर्चा करीत नाही. फक्त हिंदू आणि मुस्लीम यांचीच चर्चा होत आहे. देशाच्या सीमेवर इतके दुर्लक्ष केले जात असेल तर राज्यात रोज होणाऱ्या खुनाच्या घटनेबाबत कोणाला बोलावे असा प्रश्न पडतो.

नागपूर हे गृहमंत्र्यांचे शहर आहे. या शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती भंयकर आहे. वेळीच बंधने घातली नाही आणि परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर नागपुरात स्फोटकासारखी स्थिती निर्माण होईल अशी भीतीही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com