Pahalgam terror attack : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भ्याड हल्ल्याचे अनेक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून लक्ष्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जे पर्यटक मुस्लिम नाहीत त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. याच हल्ल्यात कर्नाटकमधील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी ठार केलं.
मात्र, यावेळी दहशतवाद्यांनी नेमकं काय केलं याबाबतचा भयानक आणि धक्कादायक थरार मंजुनाथ यांच्या पत्नीने सांगितला आहे. कर्नाटकचे व्यापारी असलेले मंजुनाथ यांना दहशतवाद्यांनी पत्नी पल्लवी यांच्या डोळ्यांसमोर गोळ्या घालून ठार केलं.
पतीला मारल्यानंतर पल्लवी यांनी दहशतवाद्यांना, 'माझ्या पतीला मारलं आता मलाही मारून टाका'; असा टाहो फोडला. मात्र, यावर दहशतवाद्यांनी, 'आम्ही तुम्हाला मारणार नाही, कारण हा सर्व भयानक प्रतार तू मोदींना जाऊन सांगावा यासाठी आम्ही तुला जीवंत सोडतोय', असं दहशतवाद्यांनी म्हटल्याचं स्वत: पल्लवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मंजुनाथ यांचा पत्नी पल्लवी यांच्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देताना दिसत आहेत. तर हा व्हिडिओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आतापर्यंत 6 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये डोंबिवलीतील तिघांसह पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.