Raj Thackeray : ''सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता, तर आज...'' ; राज ठाकरेंनी सुनावलं!

Raj Thackeray emphasizes Marathi language : पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार!
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray on Marathi Language in Schools : ''महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन...सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती.'' असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पत्रकार परिषद घेत, हिंदी भाषा केंद्र सरकारकडून थोपवली जात असल्याचा कुठही प्रकार नाही. हिंदी भाषा 'अनिवार्य', असा उल्लेख सरकार निर्णयात आहे, तो निर्णय हटवून नवा सरकारी निर्णय निर्गमीत केला जाईल, असे सांगितले आहे.

Raj Thackeray
Pahalgam Terror Attack Update : ''जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी...'' ; राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले!

यानंतर राज ठाकरेंनी म्हटले की, ''ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही , त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

Raj Thackeray
PM Modi Reaction on Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मोदींची पहिली प्रतिक्रिया ; कडक इशारा देत, म्हणाले...

तसेच ''मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील फक्त यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. '' असं राज ठाकरेंनी सांगितलं.

Raj Thackeray
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला : मोदींनी सौदी अरेबियाहून अमित शहांना लावला फोन अन् दिला 'हा' मोठा आदेश!

याचबरोबर ''सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं, पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद... पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार !''

(Edited by - Mayur Ratnapakhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com