India Vs Pakistan : पाकिस्तान भयंकर अडचणीत : भारताला मिळाली अमेरिकेची ताकद; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठ्या निर्णयाला मंजुरी

India Vs Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केली असून भारताने अजूनही गोपनीय पद्धतीनेच योजना आखण्यावर भर दिला आहे.
Narendra Modi And Donald Trump
Narendra Modi And Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

India Vs Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरु केली असून भारताने अजूनही गोपनीय पद्धतीनेच योजना आखण्यावर भर दिला आहे. यामुळे अनिश्चिततेचे सावट असलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महत्वाच्या कराराला मंजुरी दिली आहे.

भारतीय नौदलासाठी 13 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञान अमेरिकेकडून घेतले जाणार आहे. या करारामुळे भारतीय नौदल आणखी भेदक होणार आहे. अमेरिकेचे अत्याधुनिक 'सी-व्हिजन' सॉफ्टवेअर आणि त्यासंदर्भातील तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासंदर्भात भारताने अमेरिकेशी संपर्क साधला होता. याला आता ट्रम्प प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

भारताला फायदा काय?

अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतीय नौदलाची घातक क्षमता वाढणार आहे. सागरी हद्दीतील संशयास्पद हालचाली, तस्करीचे प्रयत्न किंवा शत्रूकडून सुरु असलेली तयारी या सर्वांची माहिती व विश्लेषण भारतीय नौदलाला मिळणार आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थितीत भारतीय नौदल आणखी एक पाऊल पुढे जाऊ शकते.

Narendra Modi And Donald Trump
India Vs Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचे ढग, पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा

एलओसी भागात हालचाल वाढली :

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भीतीचे सावट आहे. भारत कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असल्याची चर्चा पाकिस्तानात आहे. प्रामुख्याने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अनवर-उल-हक यांनी गुरूवारी आणीबाणीचे संकेत दिले आहेत.

Narendra Modi And Donald Trump
India vs Pakistan : PM मोदींनी एकच निर्णय घेतलाय... तोच कायम ठेवला तर हल्ला न करताही पाकिस्तानचा 'बाजार उठू शकतो...'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे यापूर्वी अनेकदा सिध्द झाले आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकप्रमाणे भारताकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला आहे. त्यादृष्टीने या भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. सध्याची सुरक्षेची स्थिती पाहून एलओसी परिसरातील संवेदशनशील भागात पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com