Indian Navy : पाकिस्तानचे मिसाईल बाहेर पडण्याआधीच भारताने दाखवली ‘डिस्ट्रॉयर’ची ताकद; अरबी समुद्रात हालचाल वाढली...

Indian Navy Responds with Strategic Precision : भारतीय नौदलाच्या ताफ्यातील स्वदेशी मिसाईल डिस्टॉयर आयएनएस सूरतमधून समुद्रात वेगाने उडणाऱ्या टार्गेटला भेदत आपली ताकद दाखवून दिली आहे.
INS Surat Missle Destroyer
INS Surat Missle DestroyerSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहे. त्यांनी थेट आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे. त्यातच पाकिस्तानकडून दोन दिवस अरबी समुद्रात मिसाइलची चाचपणी केली जाणार होती. पण त्याआधीच भारतीय लष्कराने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.

भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील स्वदेशी मिसाईल डिस्टॉयर आयएनएस सूरतमधून समुद्रात वेगाने उडणाऱ्या टार्गेटला भेदत आपली ताकद दाखवून दिली आहे. भारताने ही चाचणी यशस्वी करून दाखवत एकप्रकारे पाकिस्तानाला इशारा दिला आहे. भारतीय नौदलाने समुद्रातील आपली ताकद आता वाढवली आहे.

INS Surat Missle Destroyer
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून 'आरपार'च्या लढाईची घोषणा; म्हणाले, आता गाडण्याची वेळ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात करण्यात आलेली ही चाचणी महत्वाची मानली जात आहे. कारण पाकिस्तानकडूनही अरबी समुद्रातच मिसाइलचे परीक्षण केले जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्यानंतरच पाकिस्तानने मिसाइल परीक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्याचे नोटीफिकेशनही काढण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या मिसाइल परीक्षणाकडे भारतीय लष्कराचे लक्ष असणार आहे. याअनुषंगाने रॉ आणि आयबीची बैठक झाल्याचे समजते. पाकिस्तानकडून एकप्रकारे मिसाइलची चाचणी करून भारताला इशारा देण्याचा प्रयत्न असू शकतो. पण भारताने त्याआधीच अरबी समुद्रात पाकिस्तानची बोलती बंद करणारी चाचणी करत आरपारच्या लढाईसाठी आपणही सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

INS Surat Missle Destroyer
Pahalgam Terrorist Attack : ‘नया भारत’ फक्त मिरवण्यासाठी नको, 10 वर्षांत 2 हजारांहून अधिक जणांचा गेलाय जीव!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुरूवारी बिहारमध्ये बोलताना आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहेत. पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी आणि हे षडयंत्र रचणाऱ्यांना गाडण्याची वेळ आली असल्याचे मोदींनी म्हटले आहे. हा हल्ला पर्यटकांवर नसून भारताच्या आत्म्यावर आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी कठोर शिक्षा दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे भारताकडूनही पुन्हा दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा प्लॅन तयार केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com