
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. पर्यटकांना त्यांचे नाव व धर्म विचारून गोळ्या घातल्या. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले. आख्खा देश या घटनेने एकीकडे शोकात आहे, तर दुसरीकडे या घटनेबद्दल लोकांच्या मनात राग व संताप आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संतापलेल्या व व्यथित झालेल्या पश्चिम बंगालमधील एका मुस्लीम शिक्षकाने इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साबिर हुसैन असे या मुस्लीम शिक्षकाचे नाव आहे. हा माझा व्यक्तीगत निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. साबिर हुसैन दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बादुरिया येथील आदर्श विद्यापीठात विज्ञान विषयाचा शिक्षक आहे.
देशात सध्या धर्माच्या नावावर हिंसक घटना घडत आहेत. त्यामुळे मी दु:खी असल्याचे साबीर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मी कुठल्याही धर्माचा अनादर करत नाही. मात्र इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा चुकीचा उपयोग केला जातो. हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा शस्त्रासारखा कसा वापर केला जातो, ते मी बघितलं आहे. काश्मीरमध्ये असं अनेकदा झालं आहे. हे आता मी सहन करु शकत नाही असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना साबीर म्हणाला.
माणसाची ओळख ही केवळ माणूस म्हणून असावी, कुठल्या धर्मामुळे माणसाची ओळख नसावी. पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरु शकतं? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे असं साबिर हुसैन म्हणाला.
साबीरने हा निर्णय घेण्याआधी स्पष्ट केलं की हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यासाठी ते पत्नी आणि मुलांवर कुठलाही दबाव आणत नाहीत. पत्नी आणि मुलांना जो कुठला मार्ग निवडायचा असेल त्यांना तो निवडण्याचे स्वातंत्र्य आहे असं साबिरने सांगितलं. मुळात जिथे सर्वकाही धर्माच्या आसपास चालू आहे, अशा जगात मला राहायचंच नाही असं साबिर म्हणाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.