Malegaon ED Raids : मालेगावात एकही बांग्लादेशी सापडला नाही, अपयश लपविण्यासाठी ईडीचे छापे : माजी आमदार आसिफ शेख यांचा दावा

Malegaon ED raids, no Bangladeshi found, Asif Shaikh accuses ED of failure cover-up : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मालेगाव शहराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. मात्र पोलीस व विशेष तपास पथकास अद्याप पर्यंत एकही बांगलादेशी शहरात मिळून आलेला नाही असा दावा शेख यांनी केला आहे.
Asif Shaikh
Asif Shaikh Sarkarnma
Published on
Updated on

Malegaon News | मालेगावमधील बनावट जन्म दाखले प्रकरणाला आता वेगळं वळण आलं आहे. या प्रकरणाचा तपास विशेष पोलिस पथकाकडून सुरु असतानाच शुक्रवारी (ता. २५) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने व आयकर विभागाने शहरात सहा ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणात झालेल्या ईडी पथकाच्या एन्ट्रीवरुन माजी आमदार आसिफ शेख यांनी मात्र सरकारसह तपास यंत्रणेवरच हल्लाबोल केला आहे.

शेख म्हणाले, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मालेगाव शहराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. शहरात बांगलादेशी रोहिंग्या घसूखोर वास्तव्य करीत असल्याचा आरोप केल्या जात आहे. मात्र पोलीस व विशेष तपास पथकास अद्याप पर्यंत एकही बांगलादेशी शहरात मिळून आलेला नाही असा दावा शेख यांनी केला आहे.

Asif Shaikh
Pahalgam terror attack : 25 वर्षे संसार, माहेर पाकिस्तान तर सासर नाशिक! 'त्या' 6 महिलांबाबात काय निर्णय घ्यायचा? प्रशासनासमोर यक्षप्रश्न

गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी सुरू आहे. मात्र त्यांना शहरात एकही बांग्लादेशी आढळून आला नाही. एसआयटी व सरकार आपले अपयश लपवत आहे. तपासाचे अपयश लपवण्यासाठीच ईडी पथकातर्फे मालेगाव शहरात छापेमारी करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

दरम्यान काल, रौनकाबाद भागात मनपा कर्मचारी शेख अब्दुल तवाब यांच्या घरावर इडी पथकाने छापा मारल्याची माहिती मिळतात माजी आमदार आसिफ शेख यांनी घटनास्थळी भेट देत छापा टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. जन्ममृत्यू दाखल्या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ही तपासणी केली जात असल्याचे पथकातर्फे सांगण्यात आल्यावर आसिफ शेख यांनी अब्दुल तवाब याच्या कुटुंबीयांना पथकाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करण्याची सूचना केली.

Asif Shaikh
Ahilyanagar Karjat : रोहित पवारांना आणखी एक धक्का; बंडखोर नगरसेवकांच्या हाती 'व्हिप'ची ताकद

महापालिका कर्मचाऱ्याचा घरावर छापा

दरम्यान काल मालेगावात ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. यात शहरातील रौनकाबाद भागातील गल्ली नंबर ७ येथील महापालिकेचे जन्म मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी तव्वाब शेख यांच्यासह आयेशानगर येथील गजाला परवीन यांच्या घरांवरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत शेख यांच्या घरात जन्म व मृत्यू दाखले आढळले असून, ही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतल्याचे समजते. तसेच शेख यांच्या बँक शाखेतील खाते क्रमांकाच्या व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. तर आयेशानगरमधील गजाला परवीन यांच्या सासरच्या घरीही छापा टाकण्यात आला. या व्यतिरीक्त मोहमंद अमीन मोहमंद हसन, निवत्ती बागुल, भगिरथ चौधरी आणि शंकर महाजन यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com