BJP Maharashtra : जिल्हाध्यक्षांच्या घोषणेचा भाजप करणार 'ग्रँड इव्हेंट'; 78 जणांना खुर्चीत बसवण्याचा मुहूर्त ठरला!

BJP News : भाजपच्या जिल्हा पातळीवरील संघटनात्मक निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर आता 78 जिल्हाध्यक्षांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा मतदानाचा अंतिम टप्पाही पार पडला आहे.
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजपच्या जिल्हा पातळीवरील संघटनात्मक निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर आता 78 जिल्हाध्यक्षांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा मतदानाचा अंतिम टप्पाही पार पडला आहे. पुढील आठ दिवसांत महाराष्ट्रात एकाचवेळी भाजपच्या 78 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत.

भाजपने शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा निरीक्षक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती. याशिवाय जिल्हा पातळीवर मतदान करण्यासाठीही समितीची स्थापना केली होती. यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्षांसह, सरचिटणीस, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष अशा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Beed BJP : बीड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सुरेश धसांच्या मतदारसंघातील नियुक्त्या रखडल्या

या सर्वांना प्राधान्यक्रमाने म्हणजे 1, 2, 3 या क्रमाने जिल्हाध्यक्ष कोणाला करावे, त्यांची क्षमता काय, आदी लिहून बंद पाकिटातून द्यायचे होते. त्यानुसार प्रत्येक जिल्हा निरीक्षकांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये जाऊन मतदान जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली, त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर मतदानही पार पडले.

आता जवळपास सर्व जिल्ह्यांमधील मतदान प्रक्रिया संपली आहे. सर्व जिल्हा निरीक्षकांनी बंद लिफाफ्यात आपला अहवाल प्रदेश भाजपकडे सुपूर्द केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने प्रत्येक नेत्याने आपल्या मर्जीतील जिल्हाध्यक्ष असावा यासाठी फिल्डिंग लावली आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Chandrapur BJP leadership : मुख्यमंत्र्यांच्या काकू, माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना अभिप्राय का नोंदवता आला नाही?

चौंडीतून घोषणा होणार?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुढील महिनाभर चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच 6 मे रोजी राज्या मंत्रिमंडळाची बैठकही होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर चौंडीमधूनच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह सर्व 78 जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आठ निकषांनुसार होणार निवड :

- अनुशासित व प्रामाणिक व्यवहार असलेला इच्छुक उमेदवार असावा

- इच्छुक उमेदवार पक्षातील अनुभवी कायकर्ता असावा

- त्या उमेदवाराने यापूर्वी संघटनेच्या जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे

- इच्छुक उमेदवार हा किमान दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे

- नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा शहर-जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही

- इच्छुक उमेदवार आमदार, खासदार नसावा

- महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांचे नाव खालून आलेच पाहिजे

- शहर-जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार 45 ते 60 वयोगटातील असावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com