Pahalgam Attack Investigation : ...तर मग रशिया अन् चीनकडून पहलगाम हल्ल्याची चौकशी होणार का?

Russia and China’s Stance on Terror Investigations : जाणून घ्या, पाकिस्तानचा नेमका काय आहे या मागचा डाव अन् भारताची कशी आहे भूमिका?
Security forces on high alert in Pahalgam following the terror attack; international pressure builds for a joint investigation.
Security forces on high alert in Pahalgam following the terror attack; international pressure builds for a joint investigation. sarkarnama
Published on
Updated on

Explore the Pahalgam attack probe : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. एकीकडे भारताने आरोप केला आहे की, या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने या हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की या हल्ला प्रकरणाची रशिया आणि चीनकडून चौकशी केली जावी.

सध्यातरी भारताने पाकिस्तानच्या या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर चीनने म्हटले आहे की आमचे भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. परंतु ही मागणी करण्यामागे पाकिस्तानचा नेमका काय डाव असू शकतो, हे आपण पाहूयात.

Security forces on high alert in Pahalgam following the terror attack; international pressure builds for a joint investigation.
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांना भरली धडकी, पाकिस्तानचाही हिशेब चुकता होणार; जगभरातून भारताला पाठिंबा!

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा भारताच्या दाव्याच्या चौकशीसाठी चीन, रशियासह पश्चिमी देशांच्या तज्ज्ञांची एक चौकशी समिती गठीत केली जावी असे आवाहन केले आहे.

Security forces on high alert in Pahalgam following the terror attack; international pressure builds for a joint investigation.
India Attack Possibility : ‘’भारत कधीही हल्ला करू शकतो, सैन्य अलर्टवर; खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाच धडकी!

याबाबत आसिफ यांनी म्हटले की, मला वाटतं की रशिया, चीन किंवा पश्चिमी देश देखील या संकटात सकारात्मक भूमिका निभावू शकतात. ते एक तपास पथक गठीत करू शकतात, ज्यांना हे काम सोपवलं पाहिजे की, भारत किंवा मोदी खोट बोलत आहेत की खऱं हे तपासावं. दुसरीकडे भारताने नेहमीच भारत-पाकिस्ताना वादात एखाद्या तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपास विरोध दर्शवलेला आहे. १९७२च्या शिमला करारातही दोन्ही देशांमधील कोणत्याही प्रकारच्या वादास आपसात सोडवण्याबाबत म्हटले गेले होते.

Security forces on high alert in Pahalgam following the terror attack; international pressure builds for a joint investigation.
Khawaja Asif : 'अब आया ऊँट पहाड़ के नीचे' ; अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यास भारताने आणलं वठणीवर!

वर्ष २०१६ मध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याकडून पंजाबच्या पठाणकोट एअरफोर्स बेसवर हल्ल्यादरम्यान भारताने पाकिस्तानातून एका संयुक्त तपास पथकास हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन हल्ल्याशी निगडीत पुरावे गोळा करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे यावेळी भारताकडून याप्रकरणात कुण्या तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीस परवानगी दिली जाण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.

Security forces on high alert in Pahalgam following the terror attack; international pressure builds for a joint investigation.
China Supports Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही चीनला पाकिस्तानचाच पुळका ; 'या' मागणीचे केले समर्थन!

पाकिस्तानची या प्रकरणात तिसऱ्या पक्षाकडून हस्तक्षेपाची मागणी, म्हणजे एक डाव आहे. यामुळे असं होईल की, भारताला कोणत्याही प्रकराची कारवाई करण्यास विलंब होईल आणि तणाव कमी होण्यासही वेळ मिळेल. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर तसाही एकाकी पडलेला आहे. दहशतवादाच्या मुद्य्यावर अनेक बलाढ्य देशांनी भारताला समर्थन दिले आहे. शिवाय, जागतिक पातळीवर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखाही वेळोवेळी फाटलेला आहे. त्यामुळे आता भारतासोबत युद्ध करून पाकिस्तान कोणतंही मोठं नुकसान करून घेवू इच्छित नाही. म्हणूनच पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची रशिया व चीनकडून चौकशी केली जावी, अशी मागणी करत स्वत:ला वाचवण्यासाठी एक डाव खेळला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com