
New Delhi News : भारतानं केलेल्या एकापाठोपाठ एक दणक्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. भारताच्या कारवायांनंतर पाकिस्तानची वाटचाल आता अनागोंदीच्या दिशेने सुरू असल्याचं दिसून येत आहे. आता लष्करप्रमुख असीम मुनीरला (Asim Munir) ताब्यात घेतलं असून त्याला पदावरुन हटवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
लष्करप्रमुख असीम मुनीरच्या चिथावणीखोर भाषणामुळेच पाकिस्तानवर युध्दाची नामुष्की ओढावली असल्याचं बोललं जात आहे. त्याचमुळे मुनीरची लवकरच लष्करप्रमुख पदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. पाकिस्ताच्या लष्करप्रमुखपदी आता शमशाद मिर्झा यांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तसेच असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भारत आणि हिंदूंविरोधात भडकाऊ भाषण केल्यामुळेच पहलगामचा भीषण दहशतवादी (Pahalgam Terror Attack) झाला असल्याचा ठपका असीम मुनीरवर ठेवला जात आहे. तोच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना संपूर्ण भारताची आहे. दहशतवाद्यांना भडकावायचं आणि भारतानं प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला चढवायचा,असाच कुटील रणनीती लष्करप्रमुख असीम मुनीरची होती.
आधीच पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असतानाच लष्करप्रमुख असीम मुनीरच्या हेकेखोरपणामुळेच पाकिस्तानवर युद्धाची वेळ आल्याची भावना पाकिस्तानच्या जनतेमध्ये आहे. आताच्या घडीला आधीच आर्थिक कोंडीत अडकलेल्या पाकिस्तानला युद्ध परवडणार नसल्याचं माहिती असूनही मुनीरन पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटल्यामुळेच त्याच्याविरोधात कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे विद्यमान व वादग्रस्त लष्करप्रमुख असीम मुनीर सध्या प्रचंड अडचणीत आल्याचे चित्र आहे. भारताविरुद्ध गरळ ओकणारे मुनीर आता पाकिस्तानवर एअर स्ट्राईक झाल्यानंतर आठ तासांनंतरही गायबच आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संतापलेल्या भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केले. 'ऑपरेशन सिंदूर'चे तपशील बाहेर येण्यास सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये असंतोष आणि भीतीचे सावट तयार झाले होते. अशातच या हल्ल्यांनंतर संरक्षणाची जबाबदारी असलेले लष्करप्रमुख पाकिस्तानच्या जनतेसमोर आले नव्हते. त्याचमुळे मुनीर यांच्याविरोधातील वातावरण आणखी तीव्र होत गेले.
असीम मुनीर यांच्या कारभाराविरोधात पाकिस्तानी लष्करातूनच बंडाला सुरुवात झाल्याचे संकेत दिले जात होते. भारताच्या कारवाईनंतर अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी मुनीर यांना पदावरून हटवण्याची इच्छा मोहीम आणखी वेगानं राबवल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील एक प्रयत्नही काही दिवसांपूर्वी झाला होता. लष्कर व देशातील वातावरण मुनीर यांच्याविरोधात आहे, असे बंड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात म्हटले होतं.
'ऑपरेशन सिंदूर'नंतरदेखील बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू,पठाणकोट,जैसलमेर, होशियारपूरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हे हल्ले हाणून पाडताना भारतानं पाकचे 8 ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले. यानंतर भारताचे तीनही सैन्य दल अॅक्शन मोडवर आले असून हवाई,आर्मीनंतर आता नौदलाकडूनही पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे.
भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह,लाहोर कराची, रावळपिंडी, सियालकोट एकूण 7 शहरांवर हल्ले करण्यात आले आहेत.तर सीमारेषेवरही भारतीय जवान अलर्ट मोडवर असतानाच तिकडे नौदलासह भारताची शान असलेल्या आयएनएस विक्रांतमधून अरबी समुद्रातून पाकिस्तानवर मोठा हल्ला करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.