Mumbai News : ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हाने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. पण आत्महत्या करण्यापूर्वी मॉरिस हातात पिस्तूल घेऊन जोरजोरात ओरडत कार्यालयाबाहेर आला होता. (Abhishek Ghosalkar Case)
दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली. मॉरिसने (Mauris Noronha) त्याच्या कार्यालयात घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह केले. यादरम्यान दोघेही आनंदात दिसत होते, पण शेवटी घोसाळकर कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी उठल्यानंतर मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
मॉरिसने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो हातात पिस्तूल घेऊन जोरजोरात ओरडत बाहेर आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. ‘आय किल्ड अभिषेक, अब वो मनाली नहीं जायेगा,’ असं मॉरिस म्हणाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. गोळ्या झाडल्याचा आवाज आणि मॉरिसला पाहून कार्यालयाबाहेर गर्दी जमू लागल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिषेक घोसाळकर हे पत्नी आणि मुलांसह शुक्रवारी कुलू मनालीला फिरायला जाण्यासाठी निघणार होते. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 14 फेब्रुवारीला असल्याने मनालीला फिरायला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारच्या फ्लाइटचे बुकिंग करण्यात झाले होते. हे सगळं प्लॅनिंग मॉरिसलाही माहिती होते, असे दिसते. म्हणूनच तो घोसाळकरांची हत्या केल्यानंतर ‘अब वो मनाली नहीं जायेगा’, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे.
मॉरिसचीही हत्याच
अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसची आत्महत्या झाली नाही, तर हत्या करण्यात आली, असेच मला वाटत आहे, असे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. या दोन्ही हत्यांमागे तिसऱ्या माणसाचाच हात आहे, अशी दाट शंका मला येत आहे, या हत्यामागचा मास्टरमाइंड शोधून काढावा, असे आमदार देशमुख म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.