Imran Khan Convicted : पाकिस्तानात खळबळ, इम्रान खान यांच्यासह पत्नीला कठोर शिक्षा; काय आहे प्रकरण?

Pakistan’s former Prime Minister corruption case Bushra Bibi : अल-कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टमध्ये पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा खान यांच्यावर आरोप होता.  
Imran Khan, Bushra Bibi
Imran Khan, Bushra BibiSarkarnama
Published on
Updated on

Al-Qadir University Project Trust Case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पत्नी बुशरा बिबी यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानातील कोर्टाने इम्रान खान यांना तब्बल 14 वर्षांची तर पत्नीला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

अल-कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टमध्ये पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा खान यांच्यावर आरोप होता. कोर्टाने त्यांना 3 हजार 500 डॉलरचा दंडही ठोठावला आहे. सध्या इम्रान खान हे ऑगस्ट 2023 पासून रावळपिंडी येथील एका तुरुंगात आहेत. तिथेच अस्थायी कोर्ट तयार करण्यात आले होते. आज भ्रष्टाचारविरोधी कोर्टाचे न्यायाधीश जावेद राणा यांनी निकाल दिला. 

Imran Khan, Bushra Bibi
8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगामुळे किती वाढणार पगार, कधी होणार लागू? वाचा सविस्तर...

कोर्टामध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. तीनदा निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठी शिक्षा सुनावण्याची पाकिस्तानातील हे चौथे प्रकरण ठरले आहे.

खान यांना अल कादीर ट्रस्ट प्रकरणात मे 2023 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात समर्थकांकडून मोठे आंदोलन करण्यात आले होते. इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरच अटक केली होती. त्यावेळी ते जामिनासाठी कोर्टात आले होते.

Imran Khan, Bushra Bibi
Arvind Kejriwal Letter : केजरीवालांचे ‘लेटर पॉलिटिक्स’; मोदींकडे केली मोठी मागणी, भाजप लगेच घोषणा करणार?

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण एका विद्यापीठाशी संबंधित आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी तसेच त्यांचे सहकारी जुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान हे अल-कादिर यूनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टमध्ये सहभागी होते. इम्रान कान यांनी पंतप्रधान असताना या विद्यापीठासाठी बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची जमीन दिली होती. खान पती-पत्नीने अटक करण्याची धमकी देत ही जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप झाला होता. सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात सहा वर्षांत केवळ 32 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com