Shashi Tharoor : 'वर्कलोड'मुळे कर्मचारीचा मृत्यू? ; शशी थरूर संसदेत मुद्दा मांडणार, म्हणाले...

Shashi Tharoor on EY Employee Death : या प्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारणी चौकशीचे आदेशही दिले आहेत.
Shashi Tharoor on Pune CA  Death
Shashi Tharoor on Pune CA DeathSarkarnama
Published on
Updated on

Shashi Tharoor on Pune CA Death : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी 'Ernst and Young'ची कर्मचारी अन्ना सेबस्टियन पेरेइल यांच्या वडिलांची भेट घेवून, विचारपूस केली. त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आणि आपल्या योजनेबाबतही सांगितले. त्यांनी सांगितले की ते संसदेच्या आगामी सत्रात कामाची ठिकाणी होणाऱ्या अमानुषतेला तोंड देण्यासाठी कायदा तयार करण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत.

शशी थरूर(Shashi Tharoor) यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, अन्ना सेबस्टियन पेरेइल यांचे वडील सीबी जोसेफ यांनी त्यांना कामाच्या ठिकाणी कामाचे तास निश्चित करण्याचे सुचवले आहे. थरूर यांनी सांगितले, '' त्यांनी सुचवले आणि मी सहमती दिली, की मी संसदेच्या माध्यमातून सर्व कामांच्या ठिकाणी, मग ते खासगी असो किंवा शासकीय. कामाचे तास प्रतिदिवस आठ तास आणि आठवडाभरात पाच दिवसांसाठी ठरवण्याचा मुद्दा उपस्थित करेल.

Shashi Tharoor on Pune CA  Death
Sharad Pawar's NCP Letter to President : ...म्हणून शरद पवारांच्या पक्षाने थेट राष्ट्रपतींनाच पाठवलं पत्र, आठवडाभर पुणे मुक्कामी येण्याचं निमंत्रण!

अन्ना सेबस्टियन पेरेइलने मार्च महिन्यात E&Y इंडिया येथे कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर २० जुलै रोजी कथितरित्या कामच्या अतिशय दबावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा खुलास तेव्हा झाला जेव्हा त्यांची आई अनिता ऑगस्टाइन यांनी एक खुले पत्र लिहिले, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि लोकांचे लक्षही वेधलं गेलं. तेव्हापासून कामाच्या ठिकाणी कामाचा अतिरिक्त भार यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेस(Congress) खासदार थरूर यांनी जोर देत म्हटले की, 'मानवाधिकार कामाच्या ठिकाणी समाप्त होत नाहीत. तसेच म्हटले की, कामाच्या ठिकाणी अमानुषतेला कठोर शिक्षा आणि दंडासह समाप्त केलं पाहिजे. आगामी सत्रात मी हा मुद्दा उपस्थित करेन.' या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक आपली मतं माडत आहेत आणि अनेक सल्लेही दिले जात आहेत.

Shashi Tharoor on Pune CA  Death
Kumari Selja: हरियाणात 'खेला' होणार! ; काँग्रेसच्या कुमारी शैलजा भाजपमध्ये प्रवेश करणार?

याप्रकरणी सोशल मीडियामधून लोकांचा संताप तेव्हा उफाळला, जेव्हा अन्ना सेबस्टियन पेरेइलच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलीच्या अंत्यसंस्कारास E&Y इंडियाचा कोणताही कर्मचारी उपस्थि नव्हता. तर E&Y इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी या दाव्याचं खंडण केलं आहे की, कर्मचारीचा मृत्यू वर्कलोडमुळे झाला आहे. याप्रकरणाची दखल घेत केंद्र सरकारणी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com