उत्तरप्रदेशात पहिल्या सभेत आदित्य ठाकरेंनी मोदींवर डागली तोफ ; ''अबकी बार तीर कमान''

शिवसेनेचे उत्तर प्रदेशातील राजू श्रीवास्तव यांच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
UP Election 2022: aditya thackeray News
UP Election 2022: aditya thackeray News sarkarnama

लखनैा : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने (shivsena) कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut),पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) प्रचारासाठी उत्तरप्रदेशात दाखल झाले आहेत. (UP Election 2022)

शिवसेनेचे उत्तर प्रदेशातील राजू श्रीवास्तव यांच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ''उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आणि भाजपचे सरकार जाणार,'' असा ठाम विश्वास ठाकरेंनी आज व्यक्त केला.

डुमरियागंज विधानसभा मतदार संघात झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. भाजपाच्या बालेकिल्ल्यातच आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोना काळातील केंद्र सरकारची एक आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

ठाकरे म्हणाले, ''उत्तर प्रदेशच्या जनतेला घाबरवून भाजप राज्य करीत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात फक्त दंगलीची भाषा करण्यात आली आहे. कोरोना काळातही राजकारण करण्यात आले. कोरोनाचे संकट ही राजकारण करण्यासारखी गोष्ट नव्हती,''

UP Election 2022: aditya thackeray News
पाच वर्षापूर्वी विजयाचा गुलाल, २०२२ ला याच दिवशी टेन्शनच

आदित्य ठाकरे म्हणाले, ''जनता कर्फ्यु लावण्यात आल्यावर उत्तर प्रदेश, बिहारचे जे नागरिक मुंबईत राहत होते, त्यांना आपल्या गावी, आपल्या आईवडिलांकडे, परिवाराकडे परतायचं होतं. रेल्वे स्थानकांवर गर्दी जमली होती, रेल्वे कधी सुटणार याची ते वाट बघत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा केंद्र सरकारला सातत्याने फोन करीत होते की उत्तर प्रदेश, बिहारच्या बांधवांना आपल्या घरी जायचं आहे, त्यामुळे रेल्वे सोडा. मात्र तरीही भारत सरकारने १ मे पर्यंत रेल्वे बंद ठेवल्या. हे किती लाजीरवाणी बाब आहे,''

“सगळे लोक हे चालत आपल्या गावी जात होते. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी सर्वांना भावनिक आवाहन केलं, आम्ही काळजी घेतो असं सांगून त्यांना परत न जाण्याचं आवाहन केलं. जेवण, राहणं, आरोग्यसुविधा या सगळ्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. यातूनही जेव्हा रेल्वे सोडण्यात आल्या तेव्हा लाजिरवाणी गोष्ट अशी की रेल्वेने तिकीटाचेही पैसे मागितले. तेव्हा हे तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री रिलीफ फंडातून देण्यात आले. हे निवडणुकीसाठी नव्हतं. हे एक प्रेमाचं, बंधुत्वाचं नातं होतं,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेस जबाबदार असल्याची टीका उत्तरप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मोदींना या टीकेला आदित्य ठाकरेंनी या सभेत प्रत्युत्तर दिले. ''कोरोना महामारीच्या काळात पहिल्या लाटेदरम्यान मजुरांच्या आपापल्या राज्यात परतण्याच्या तिकीटाचे पैसेही मुख्यमंत्री रिलीफ फंडातून दिले,'' असे ठाकरे म्हणाले.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. हे मतदान सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून ७ मार्च रोजी अखेरच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे.

UP Election 2022: aditya thackeray News
महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल ; लहान मुलांचं वादग्रस्त चित्रिकरण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com