पंडित चटर्जींनी पद्म नाकारला अन् म्हणाले, या वयात हा पुरस्कार शोभत नाही!

मोदी सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून वाद निर्माण झाला आहे.
Pandit Anindya Chatterjee
Pandit Anindya Chatterjee
Published on
Updated on

नवी दिल्ली : मोदी सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू झाला आहे. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला असून, काहींना तो मिळाल्यावरून वाद सुरू झाला आहे. प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंद्य चटर्जी (Anindya Chatterjee) यांनी हा पुरस्कार नाकारला असून, यावर्षी पद्म सन्मान नाकारणारे ते तिसरे व्यक्ती ठरले आहेत.

पंडित अनिंद्य चटर्जी यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला असून, आता माझे हा पुरस्कार स्वीकारण्याचे वय नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पद्मश्री स्वीकारण्याचे माझे वय निघून गेले आहे. मला खूप आधीच पद्मश्री मिळायला हवा होता. आता या वयात माझ्या सारख्या कलाकाराला पद्मश्री स्वीकारणे शोभा देणारे नाही. मी अतिशय आदरपूर्वक हा पुरस्कार नाकारत आहे. मी या पुरस्कार देण्यासाठी माझा विचार झाल्याबद्दल सरकारचे आभार मानतो. मात्र, कारकिर्दीच्या या वळणावर मी हा पुरस्कार स्वीकारण्यास तयार नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कलाकारांना खूप आधीच हा सन्मान मिळाला आहे. मी तुमची माफी मागतो मात्र, हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही.

Pandit Anindya Chatterjee
मोदी सरकार तोंडघशी; तिघांनी पद्म सन्मान नाकारला!

पंडित रविशंकर, उस्ताद अमजल अली खान आणि उस्ताद अली खान अकबर खान यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत कला सादर करणाऱ्या चटर्जी यांनी पुरस्काराला संमती दिली नव्हती. त्यांना यासाठी फोन आला त्यावेळीच त्यांनी नकार कळवला होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळी राष्ट्रपती भवनात चटर्जी यांनी कला सादर केली होती. ब्रिटनच्या संसदेतील सभागृहात कला सादर करणारे ते सर्वांत कमी वयाचे तबलावादक आहेत. त्यांचा 2002 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरव करण्यात आला होता.

Pandit Anindya Chatterjee
ममतांना मोठा धक्का! निवडणुकीआधी सरचिटणीसांनीच पाडलं तोंडावर

चटर्जी यांच्यासह तीन जणांनी यावर्षी पद्म सन्मान नाकारला आहे. यात पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) आणि ज्येष्ठ बंगाली गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार नाकारण्यात आल्याने मोदी सरकारवर (Modi Governement) नामुष्की ओढवली आहे. यात नेमकी चूक कुणाची अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पद्म पुरस्का जाहीर करण्याआधी केंद्र सरकार संबंधित व्यक्तीला दूरध्वनी करून त्याची संमती घेते. त्या व्यक्तीने संमती दिल्यानंतरच हा पुरस्कार जाहीर होतो. त्यामुळे पद्म पुरस्कार नाकारण्याचे आतापर्यंत केवळ अपवाद घडले आहेत. यावर्षी तब्बल तीन व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारल्याने सरकारची फजिती झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com