Parliament Attack 2001 : संसदेत २२ वर्षांपूर्वी काय घडले होते ?

Parliament Attack : २२ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच कर्मचारी, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेच्या दोन रक्षकांसह एकूण ९ जण शहीद झाले होते.
Terrorist Attact on Parliament
Terrorist Attact on ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Parliament Attack : संसद भवनावर १३ डिसेंबर २००१ रोजी एका पांढऱ्या राजदूत कारमधून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवनावर (Parliament Attack) दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याला बुधवारी २२ वर्ष पूर्ण झाली असतानाच २२ वर्षांनी त्याच दिवशी तिघे जण संसदेत शिरल्याने या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. संसदेचे कामकाज सुरु असताना हा प्रकार घडल्याने संसदेतील खासदार भयभयीत झाले होते. सुमारे २२ वर्षापूर्वी झालेल्या या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच कर्मचारी, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेच्या दोन रक्षकांसह एकूण ९ जण शहीद झाले. होते तर हल्ला करणारे पाचही दहशतवादी मारले गेले होते.

Terrorist Attact on Parliament
Parliament Security Breach : धक्कादायक!, लोकसभेची सुरक्षा भेदली, दोन तरुण लोकसभेत घुसले

२२ वर्षांनंतरही संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संसदेत तिघे जण शिरले. संसदेचे कामकाज सुरु असताना हा प्रकार घडल्याने संसदेतील खासदार भयभयीत झाले होते. दरम्यान, पोलीस व सुरक्षारक्षकांनी त्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्या दिवशी बहुतांश खासदार संसदेत उपस्थित होते आणि शवपेटी घोटाळ्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्यांनी गदारोळ केला. त्यानंतर सकाळी ११.२९ च्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची अॅम्बेसेडर कार संसद भवनाच्या दिशेने वेगाने आली आणि मुख्य प्रवेशद्वारावरील बॅरिकेड तोडून आतमध्ये प्रवेश केला. पांढऱ्या राजदूत कारवर गृह मंत्रालयाचे (home minstery) स्टिकरही लावण्यात आले होते.

'त्या' दिवशी नेमके काय घडले

शवपेटी घोट्याळ्यावरुन संसदेत १३ डिसेंबर 2001 रोजी सुरू असलेली चर्चा गदारोळामुळे स्थगित करावी लागली होती. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी संसद भवनातून निघून गेले. पण गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 100 जण संसदेत उपस्थित होते. त्यानंत एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून पाच सशस्त्र हल्लेखोर संसदेत घुसले. 5 दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. सुरक्षा दलांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.

सुरक्षा दलांनी केला सर्व दहशतवाद्यांचा खात्मा

संसद परिसरात कारमधून आलेल्या जैशच्या पाच दहशतवाद्यांनी एके-४७ मधून गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून संसद परिसरात उपस्थित असलेले सुरक्षा दल सज्ज झाले. घाईगडबडीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ पदभार स्वीकारून संसदेचे प्रवेशद्वार बंद केले. सुमारे ४५ मिनिटे संसदेत गोळीबाराचा आवाज ऐकू आला. समोरासमोर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Terrorist Attact on Parliament
PM Narendra Modi Car : 'मर्सिडीज मैबैक एस650' पीएम मोदींच्या ताफ्यात 10 कोटी रुपयाची कार ; पाहा कारचे फीचर्स

30 मिनिटे सुरू होता थरार

संसद परिसरात हा थरार जवळपास 30 मिनिटे सुरू होता. त्यामध्ये पाचही हल्लेखोर मारले गेले. या दहशतवादी हल्ल्यात जेपी यादव, मतबर सिंग, कमलेश कुमारी, नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, घनश्याम, बिजेंदर सिंग, देशराज हे सुरक्षाकर्मी शहीद झाले आणि एएनआय वृत्तसंस्थेचा कॅमेरामन विक्रम सिंह बिश्त याचाही मृत्यू झाला. तर 18 जण जखमी झाले होते.

चौकशी केल्यानंतर या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू असल्याचे तपासात उघड झाले. सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरूला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. 9 फेब्रुवारी 2013 रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगात अफझल गुरूला फाशी देण्यात आली.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com