Parliament Security Breach : दोन तरुण लोकसभेत घुसल्याने खासदारांची पळापळ; नेमकं काय घडलं ?

Parliament Winter Session 2023 : सुरक्षारक्षकांनी या तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु.
Parliament Security Breached
Parliament Security BreachedSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संसदेचे कामकाज सुरु असताना दोन अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक सभागृहात उड्या मारल्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. एवढंच नाही तर या अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीत उड्या मारताना स्मोक कॅण्डल पेटवल्या होत्या.

संसदेचे कामकाज सुरु असतानाच अचानक अज्ञात तरुणांनी सभागृहात उड्या मारल्यामुळे सभागृहातील खासदारांची पळापळ झाली. यानंतर तातडीने सुरक्षारक्षकांनी या तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकारानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यामुळे संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parliament Security Breached
Parliament Attack 2001 : संसदेत २२ वर्षांपूर्वी काय घडले होते ?

दरम्यान, लोकसभेत घुसलेल्या अज्ञात दोन तरुणांची नावे आता समोर आली आहेत. या दोन तरुणांबरोबर एका तरुणीचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अमोल शिंदे असे एकाचे नाव असून हा महाराष्ट्रातील लातूरमधील असल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या तरुणाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संसदेच्या बाहेर काय घडलं ?

लोकसभेत अज्ञात दोन तरुण घुसले, यावेळी मोठा गोंधळ उडाला. मात्र, याचवेळी संसदेच्या बाहेर सरकारच्या विरोधात एक तरुणी घोषणा देत होती. या तरुणीचे नाव नीलम कौर असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. नीलम कौर ही हरियाणातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या तरुणांना म्हैसूर येथील एका खासदाराच्यामार्फत पास मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दोन अज्ञात तरुण आणि एक मुलगी हे संसदेत का शिरले ? त्यांचा हेतू काय होता, अशा अनेक प्रश्नाची उत्तर चौकशीनंतरच समोर येणार आहेत.

(Edited by- Ganesh Thombare)

Parliament Security Breached
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन; अमोल शिंदेंसह तीन जण ताब्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com