Lok Sabha MP salary : लोकसभेतील ‘या’ दोन खासदारांची बातच न्यारी! वेतन तर सोडाच पण सरकारी सुविधाही नाकारल्या...

Naveen Jindal MP salary refusal, Bimol Akoijam salary refusal : विशेष म्हणजे काही खासदारांची संपत्ती हजारो कोटींची आहे. त्यानंतर ते भत्ते किंवा सुविधा सोडत नाही. पण काँग्रेसचे खासदार अंगोमचा यांची बातच न्यारी आहे.
Lok Sabha
Lok Sabha Sarkarnama
Published on
Updated on

MPs reject salary India : आमदार-खासदार म्हटले की त्यांना मिळाणारे वेतन आणि सरकारी सुविधांची चर्चा सातत्याने होत असते. त्यामध्ये सातत्याने वाढच होत आलेली आहे. लोकसभेतील खासदारांना दरमहा सुमारे सव्वा लाख रुपये वेतन मिळते. त्याचप्रमाणे दैनिक भत्ता, पेन्शन, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता अशा अनेक सवलतीही दिल्या जातात. त्या वाढवून मिळण्यासाठी अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदार एकजुट होतात.

खासदारांना सरकारकडून मिळणारे वेतन आणि सुविधा नाकारण्याचा पर्यायही असतो. ते धाडस कुणी करत नाही. पण दोन असे खासदार आहेत, ज्यांनी वेतनासह सुविधाही नाकारल्याचे समोर आले आहे. कुरूक्षेत्रचे भाजपचे खासदार नवीन जिंदाल आणि मणिपूरमधील काँग्रेसचे खासदार डॉ. बिमोल अकोइजाम अंगोमचा अशी या दोघांची नावे आहेत.

लोकसभा सचिवालयाने एका आरटीआय अर्जावर दिलेल्या उत्तरामध्ये जिंदाल आणि अंगोमचा यांची माहिती दिली आहे. या दोघांनी मन मोठं करत केवळ वेतनच नव्हे तर सर्व सरकारी भत्ते आणि सुविधाही नाकारल्या आहेत. या दोघांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या दोघांची चर्चा संसदेसह देशभरात सुरू आहे.

Lok Sabha
Om Birla News : मोठी बातमी : ओम बिर्ला यांचा अध्यक्षांच्या आसनावर न बसण्याचा निर्णय! लोकसभेत पहिल्यांदाच घडलं असं, सरकार-विरोधकांमध्ये घमासान

विशेष म्हणजे काही खासदारांची संपत्ती हजारो कोटींची आहे. त्यानंतर ते भत्ते किंवा सुविधा सोडत नाही. पण काँग्रेसचे खासदार अंगोमचा यांची बातच न्यारी आहे. निवडणूक शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांची संपत्ती केवळ ९७ लाख रुपये एवढी आहे. त्यानंतरही त्यांनी वेतन नाकारले आहे. मात्र, भत्ते आणि सुविधा त्यांना मिळतात.

नवीन जिंदाल यांनी मात्र वेतनासह भत्ते आणि सुविधाही घेतलेल्या नाहीत. त्यांची संपत्ती सुमारे १२४१ कोटी रुपये एवढी आहे. सर्वात श्रीमंत खासदारांपैकी ते एक आहेत. वेतन, भत्ते, सुविधा नाकारणारे ते लोकसभेतील एकमेवर खासदार आहेत. अंगोमचा आणि जिंदाल यांच्या संपत्तीमध्ये मोठी तफावत आहे. मात्र, या दोघांनीही एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

Lok Sabha
Ramdas Athawale : 'शिर्डी नाही मिळाली, पण देशभर लढणार!' आठवले आता 'RPI'ला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी देशभर दौऱ्यावर

सर्वात श्रीमंत खासदार कोण?

लोकसभेत सध्या जिंदाल यांच्यापेक्षा दुप्पटीहून अधिक संपत्ती असलेले खासदारही आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघाचे टीडीपीचे खासदार डॉ. चंद्र शेखर पेम्मासानी हे सर्वाधिक श्रीमंत खासदार आहे. त्यांची संपत्ती तब्बल ५ हजार ७०५ कोटींची आहे. त्यांच्या खालोखाल भाजपचे खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती साडे चार हजार कोटींहून अधिक आहे.

दरम्यान, लोकसभेतील एकूण ५४३ जागांपैकी दोन जागा सध्या रिक्त आहेत. सचिवालयाकडून आरटीआयमध्ये विद्यमान ४८१ खासदार वेतन घेत असल्याची माहिती दिली आहे. पण जिंदाल व अंगोचमा वगळता अन्य खासदारांची माहिती वेतन घेणाऱ्या खासदारांच्या यादीत देण्यात आलेली नाही. त्यामुळे या खासदारांबाबचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com