Parliament monsoon session update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाने 87 दिवसांचा 'तो' विक्रम मोडला; आज 88 वा दिवस, पण अजूनही सत्रावसान नाही...

Parliament session 2026, 88 days record, monsoon session delay : संसदेचा यापूर्वीचा अधिवेशन सत्रावसनापर्यंतचा सर्वाधिक कालावधी २००८ मध्ये ८७ दिवसांचा होता. तसेच १९८७ मध्ये ७६ दिवस, १९८९ मध्ये ५४ दिवस, २००६ आणि २०१३ मध्ये प्रत्येकी ४९ दिवस आणि १९६३ मध्ये ४१ दिवसांचा समावेश आहे.
PM Narendra Modi Lok Sabha
PM Narendra Modi Lok SabhaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parliament prorogation news : संसदेचे पावसाळी अधिवेशन स्थगित तहकूब होऊन ८८ दिवस उलटले आहेत. पण अजूनही सत्रावसान झालेले नाही. त्यामुळे २००८ मधील यूपीएच्या काळातील ८७ दिवसांचा विक्रम मोडित निघाला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

संसदेच्या अधिवेशनाचे कामकाज तहकूब केल्यानंतर राष्ट्रपतींकडून सत्रावसानाचा आदेश जारी केला जातो. त्यानंतरच अधिवेशनाचे कामकाज अधिकृतपणे समाप्त होते. पण १३ ऑगस्टनंतर ८८ दिवस उलटले तरी तसा आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही. असा आदेश येईपर्यंत सरकारच्या विनंतीनुसार पावसाळी अधिवेशनाचा कालावधी पुढे वाढविता येऊ शकतो.

सध्याच्या अधिवेशनात संसदेचे विस्तारित अधिवेशन किमान दोन दिवसांच्या सूचनेवर बोलावले जाऊ शकते, तर नवीन अधिवेशन बोलावण्यासाठी किमान १४ दिवसांची नोटीस देणे आवश्यक असते. विरोधकांनी त्यावरून थेट केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले आहेत.

PM Narendra Modi Lok Sabha
Gokul chairman election : 'गोकुळ'प्रकरणी सर्वात मोठी बातमी; सतेज पाटील यांना पहिला धक्का, चार संचालकांना मतदान करता येणार, कोर्टात काय घडलं?

जयराम रमेश यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा विक्रम लोकसभेतील कलंकित दोन-तृतीयांश बहुमताचा फेरफार करून घातक आणि विध्वंसक मतदारसंघ पुनर्रचना विधेयके मंजूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना वेळ मिळावा, यासाठी करण्यात आला आहे. 17 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या षडयंत्राचा पराभव करणाऱ्या विरोधकांची एकजूट आणि एकता पुन्हा एकदा असा प्रयत्न झाल्यास त्यावरही विजय मिळवेल.

PM Narendra Modi Lok Sabha
Gokul controversy : मोठी बातमी : 'गोकुळ'मधील चार तज्ज्ञ संचालकांची नावे उघड; सतेज पाटलांनीच केले जाहीर, एका नावाने बसला धक्का...

दरम्यान, संसदेचा यापूर्वीचा अधिवेशन सत्रावसनापर्यंतचा सर्वाधिक कालावधी २००८ मध्ये ८७ दिवसांचा होता. तसेच १९८७ मध्ये ७६ दिवस, १९८९ मध्ये ५४ दिवस, २००६ आणि २०१३ मध्ये प्रत्येकी ४९ दिवस आणि १९६३ मध्ये ४१ दिवसांचा समावेश आहे.

यूपीए सरकारविरुद्ध अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी २००८ मध्ये लोकसभा २१ आणि २२ जुलै रोजी पुन्हा बोलावण्यात आली होती. त्यानंतर अधिवेशन स्थगित करण्यात आले नव्हते. पुन्हा १७ ऑक्टोबर रोजी अधिवेशन झाले आणि २४ ऑक्टोबर रोजी ते तहकूब करून १० डिसेंबर रोजी पुन्हा सुरू करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.