Nagpur News : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी 'पनौती'; तुपकरांचा हल्लाबोल, पोलिस अन् शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

Nagpur Winter session: रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले...
Nagpur Winter session
Nagpur Winter sessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: 'हे सरकार शेतकऱ्यांचे, सामान्यांचे सरकार आहे,' असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज गंभीर टीका केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रासाठी 'पनौती'आहे, असा हल्लाबोल तुपकरांनी मुख्यमंत्र्यांवर केला. तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Nagpur Winter session
Sharad Pawar News: खासदारांचे निलंबन हे खेदजनक...; पवारांचे उपराष्ट्रपतींना पत्र

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज (मंगळवार) तुपकरांनी विधानभवनावर मोर्चा काढला आहे. विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. शेकडो शेतकऱ्यांसह तुपकर यांचा ताफा महाराजबाग चौकात अडवण्यात आला. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, रविकांत तुपकर विधानभवाकडे जाण्यावर ठाम आहेत. तुपकर यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले. यावेळी पोलिस आणि तुपकर यांच्यात खडाजंगी झाली. विधानभवनासमोर तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणजे बोलायचीच कढी अन् बोलायचाच भात' आहे, असे तुपकर म्हणाले.

कापूस आणि सोयाबीन प्रश्नावरुन रविकांत तुपकर हे आक्रमक झाले आहेत. या दोन्ही पिकांच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. नुकसानभरपाई आणि पिकविम्याचे पैसे तात्काळ जमा व्हावेत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Nagpur Winter session
Congress News: कार्यकर्त्यांनो, सत्ता, पदे आम्ही उपभोगतो; बैठका तुम्ही करा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com